कधीही आपण कुठलीही गोष्ट करतानाप्रथम ती गोष्ट करण्याचे मनात येणे खूप महत्त्वाचे असते.म्हणजे मनामध्ये की मला अमुक हा व्यवसाय करायचा आहे, याबद्दल सकारात्मक विचार येणे म्हणजे त्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याची ही पहिली पायरी असते.
नंतर मग त्या व्यवसायाच्या एकेक टप्प्यांचा विचार करून अत्यंत सूक्ष्म आणि बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या व्यवसायाची सुरुवात करणे फार महत्त्वाचे असते. कारण सुरुवात ही कधीही लहानच असते. परंतु कालांतराने ती खूप कष्ट, जिद्द आणि व्यवसायातील बारकावे त्यांचा सूक्ष्म अभ्यास करून एकएक टप्पा गाठत जाणे फार महत्त्वाचे असते. मग त्या लहानशा व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होते. अशीच एका यशस्वी शेतकरी आणि व्यवसायिकांची रोमहर्षक कहानी आपण या लेखात पाहणार आहोत. त्यांनी त्यांच्या व्यवसायाची इवलेसे रोपटे लावले. परंतु त्याचे आता एक वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
राहुल बेलसरे यांची यशोगाथा
आपण मनानें ठरविले तर वाळवंटात ही झाडं उगवता येते.अशीच गोष्ट आहे एका शेतकर्याची तो म्हणजे राहुल प्र.बेलसरे हे शेतकरी व व्यवसायिक सुद्धा आहे. यांनी जेव्हा शेती हाताळली तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली की आपन सेंद्रिय शेती किंवा पारंपारिक शेती केली तर व त्याच दिवशी ठाम निर्णय घेतला की आज पासून सुरुवात करावी
तेच स्वप्न उराशी बाळगून एक छोटं गांडुळ युनीट केले त्या नंतर कृषी विभागाच्या सहकार्याने एक गट तयार करून त्या गटाला भुमिरत्न गांडूळ खत व गांडूळ बीज उत्पादन प्रकल्प हे नाव दिले हा प्रकल्प 2006 पासून चालू असून .एका गांडूळ खत च्या बेड पासून सुरवात केली ते आज 110 बेड परेंत संख्या झाली आहे .तसेच एका युनिट पासून आज दोन गांडूळ खात युनिट आहे .तसेच सोबत अमरावती ते चांदुर रेल्वे रोड वर शेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र देखील चालू केले आहे. तसेच या प्रकल्पाला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे ते परम कर्तव्य मानतात आणि शेतकऱ्यांना विषमुक्त शेती,शेंद्रीय शेती साठी प्रोत्साहित करणे व गावातच रोजगार निर्मिती करणे व त्याच बरोबर कृषी प्रदर्शन असो की कृषी सोहळा हे आपल्या सर्व शेतकरी यांना घेऊन जातात . सर्वांना गांडूळ खत तयार करण्यासाठी मदत करतात जसे शक्य होईल तसे शेतकरी यांना नेहमी भेटी देत रहातात झाले व त्यांनी या कामाचं पुर्ण श्रेय कृषी विज्ञान केंद्र घातखेड ला दीले आहे.
धन्यवाद मित्रांनो
राहुल बेलसरे
चांदुर रेल्वे
लेख संकलन
श्री. मिलिंद.जे. गोदे
Mission agriculture soil information
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा कर्ज..
Share your comments