आजच्या पिढीचा विचार केला तर विशेषत जी तरुण उच्चशिक्षित असतात त्या तरुणांना शेती करणे म्हटले म्हणजे वेळ फुकट घालण्यासारखे वाटते. परंतु जर समाजाचा अभ्यास केला असे बरेच उच्चशिक्षित तरुण या सगळ्या गोष्टींना फाटा देत शेतीकडे वळताना दिसत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजस्थान मधील अभिषेक जैन हा तरुण. तर चला पाहूया अभिषेक ची यशोगाथा..
राजस्थान मधील संग्राम गड भागात आपल्यात दोन एकराच्या जमिनीवर सन २००७ सालापासून अभिषेकने सेंद्रिय पद्धतीने लिंबू आणि पेरूची उत्पन्न घेणे सुरू केले अभिषेक शिक्षणाचा विचार केला तर अभिषेकने बी कॉमच्या शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलांच्या निधनानंतर मार्बलच्या धंद्यात असलेला अभिषेकला शेतीकडे लक्ष द्यावे लागले. सन २०१४ पर्यंत कशाचे पीक घ्यायचे याबद्दल अभिषेकला कुठलीच माहिती नव्हती. अभिषेकने सांगितले की, तो शेतीमधील विविध प्रकारचे प्रयोग करायचा अगोदर त्यांनी डाळिंबाची शेती करण्याचा प्रयत्न केला, परंतु रासायनिक खतांमुळे संपूर्ण पीक खराब झाल्यानंतर अभिषेकने सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. खतांसाठी प्रामुख्याने शेणखत आणि जीवामृत वापरायचे अभिषेकने ठरवले. याचा चांगला फायदा मिळाल्यानंतर अभिषेकने सेंद्रिय शेती करणे सुरू केले.
हेही वाचा : शिवनेरी गोट फॉर्मची यशोगाथा; उत्तम चारा व्यवस्थापन करुन साधले यश
अभिषेकला सुरुवातीला पेरू आणि लिंबूची लागवड करून त्यांना शेणखत आणि नैसर्गिक खतांचा वापर करणे सुरु केल्यामुळे चांगले उत्पन्न मिळायला लागले. रासायनिक खतांचा खर्च वाढल्यामुळे लिंबाच्या शेतीमधून आणखी जोडधंदा करायचा विचार अभिषेकने केला. यामध्ये अभिषेक लिंबूचा रस करण्यापासून ते लिंबूचे लोणचे तयार करण्यापर्यंत अभिषेक आणि त्याचा परिवाराने घरातच काम करायला सुरुवात केली. अभिषेकने तयार केलेल्या लोणच्याची मागणी हळूहळू वाढायला लागली.
२०१६ साली अभिषेकने तब्बल ५०० ते ७०० किलो लिंबाचे लोणचे विकले. ९०० ग्रॅमच्या लोणचं बाटलीसाठी २०० रुपये दर आकारला. लिंबू बाजारात विकून आणि लोणच्या माध्यमातून अभिषेक जवळ-जवळ सहा लाखाचे उत्पन्न कमवतो. तसेच पेरूचा कॉन्टॅक्ट खाजगी कंपन्यांना दिल्यामुळे पेरूच्या शेती मधूनही त्याला साडेतीन ते चार लाखांचा फायदा होत आहे.यावरून समजते की, अफाट जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल कुठल्या क्षेत्रात माणूस अतुलनीय यश मिळवू शकतो.
Share your comments