MFOI 2024 Road Show
  1. यशोगाथा

Success Story : ऊस शेतीसोबतचं दूध व्यवसायातील उन्नती

अलगुडे शेतीत मुख्य पीक म्हणून ऊस लागवड करतात. जास्तीत जास्त क्षेत्रात आम्ही ऊसाच उत्पन्न घेतो असं ते सांगतात. मात्र काही उर्वरित शेतीत सिजनल पीके घेतो, यात कधी कांदा, गहू, हरभरा अशी सिजनल पीके पण घेत असतो. ऊस हे पिक शाश्वत उत्पन्न देणार पीक आहे. म्हणून आम्ही त्याच पिकावर जास्त लक्ष देऊन त्यातच उत्पादन काढण्याचा प्रयत्न करीत असतो.

Success Story News

Success Story News

बारामती तालुक्यातील सावंतवाडी गावातील अजय अलगुडे हे शेती व्यवसाय आणि दुधाचा व्यवसाय करतात. त्यांना एकूण ८ एकर जमीन असून ते त्यात ऊस लागवड आणि सिजनल पीके घेतात. अलगुडे यांचे एकूण ३ जणांचे छोटे कुटुंब आहे तरी ते शेती, दूध व्यवसाय आणि स्वत:चा व्यवसाय सांभाळतात. हे सर्व पाहत असताना त्यांनी त्यांच्या शेतीत नावीन्य जपले आहे. तसंच ते दूध व्यवसाय देखील करत असून त्यांनी शेतीत नावीन्य टिकवले आहे.

अलगुडे शेतीत मुख्य पीक म्हणून ऊस लागवड करतात. जास्तीत जास्त क्षेत्रात आम्ही ऊसाच उत्पन्न घेतो असं ते सांगतात. मात्र काही उर्वरित शेतीत सिजनल पीके घेतो, यात कधी कांदा, गहू, हरभरा अशी सिजनल पीके पण घेत असतो. ऊस हे पिक शाश्वत उत्पन्न देणार पीक आहे. म्हणून आम्ही त्याच पिकावर जास्त लक्ष देऊन त्यातच उत्पादन काढण्याचा प्रयत्न करीत असतो.

पाणी नियोजन
आमच्या भागात तशी पाणी टंचाई काही प्रमाणात जाणवते पण शेती शेजारून कॅनॉल गेल्या असल्याने आणि विहीर असल्याने पाणी टंचाई एवढी जाणवत नाही. तशी ९० टक्के १० महीने पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील कारखान्यात ऊस पाठवणे सोईचे जाते. त्याच बरोबर १२ महीने चालणारी गुर्हाळे पण आता आहेत. त्यामुळे ऊस शेतीमध्ये ऊस पिकावर जास्त भर दिला जातो.

ऊस शेती फायद्याची
ऊस शेती नक्कीच फायद्याची आहे पण त्यामधे आता काही बदल करावे लागत आहेत. कारण तेचतेच पीक घेऊन जमीन नापिक होत चालली आहे. त्यामुळे आता पिकाबरोबर आता जमिनीचे आरोग्य पण संभाळणे जास्त गरजेच आहे. नाही तर फक्त रासायनिक खते, औषध वापरुन जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यासाठी आपण आपल्या शेतीमधे जास्त भर हा जमिनीचे आरोग्य जपण्याकडे दिला पाहिजे.

पाचट कुजवून सेंद्रिय खत
आडसाली ऊस आणि खोडवा ऊस तुटल्यानंतर पाचट न जाळता त्याला कुजवुन त्याचे सेंद्रिय खतांत रुपांतर करतो. त्याच बरोबर पीक बदल किंवा हिरवळीच्या खतांचा वापर, जमिनीला विश्रांती या सारख्या काही बाबी वापरुन आपण आपल्या जमिनिचा सेंद्रिय कर्ब आजपर्यंत १ टक्के नेण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे फायदा असा होतो की पिकांना जास्त खताची किंवा रासायनिक औषधांची गरज पडत नाही. शेती आणि जनावरांना पाणी असते. तसंच एखाद्या साली जनावरांना चारा टंचाई निर्माण होणार असल्याची चिन्हे दिसतात. तेव्हा मात्र काही ऊस जनावारांना चारा म्हणून राखून ठेवावा लागतो. आपण आपल्या शेती मधे एकात्मिक धोरण राबवण्याचा प्रयत्न करीत असतो. यात सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक अशा घटकांचा वापर करुन उत्पन्न वाढीबरोबरच जमिनीच आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करीत असतो. ऊस शेतीमधे काही वर्षापासून आपण आपल एक मॉडेल तयार केलं आहे. यात खत जमिनिची पुर्व मशागत, सेंद्रिय वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांच वापर, तसेच ऊस रोपांची लागवड, त्यामधे आळवणी, फवारणी आणि खत देण्याची पद्धत तसेच खतांचे डोसेस हे स्वता अनुभवातुन तयार केलेले आहे. यातून काही वर्षापासून दरवर्षी एकरी ८५ टनाच उत्पादन घेण्यात यशस्वी झालो आहे.

सिजनल पीक नियोजन
ज्या वर्षी पाण्याची टंचाई जानवणार असे वाटते त्या वर्षी ज्वारी आणि हरभरा पीक लागवडी कल देतो. कारण या पिकांना पाणी कमी लागते. तसंच त्या वर्षी ज्वारी पीक लागवड केल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मिटतो आणि घरी ज्वारी देखील होते. यामुळे पाणी पाहून सिजनल पीके घेण्याचा मानस असतो. यंदाच्या साली अलनिनोचे वर्ष असल्याने पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे कॅनॉलला किती पाणी असेल हे सांगता येत नाही. यामुळे यंदाच्या रब्बीत ज्वारी, हरभरा आणि काहीसा गहू (घरी खाणे इतका) लागवड केली आहे.

उत्पादन खर्च
एकूण ८ एकर जमीन आहे. त्यात सरासरी एकरी २० ते २५ हजार रुपये उत्पादन खर्च होतो. आणि उत्पन्न ७० ते ७५ हजार रुपये मिळते. तसंच शेतीत मजूर काम करण्याचे ९० टक्के टाळतो. कारण यांत्रिकीकरणाचा वापर करतो. आज मजूर कामासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. आणि वेळेला मजूर पण मिळत नाही. यामुळे यांत्रिकीकरणाकडे भर आहे. यामुळे काम कमी वेळेत आणि स्वस्तात होते. असे माझं मत आहे. तसंच शेतीतील कामे स्वत:च करण्याचा जास्त प्रयत्न असतो.

दूध नियोजन
शेती करत असताना दूध व्यवसायाकडे कल वाढला. सुरुवातील ३ गाईपासून सुरुवात केली होती. आता एकूण १६ गाई झाल्या आहेत. त्यापासून सरासरी ७० ते ८० लीटर दूध मिळते. या १६ गाईमधील ३ ते ४ गाई गाभण असतात. त्यामुळे त्याची गाभण धारणा नियोजन आता करत आहे. दूधाला आता ३१ ते ३२ रुपयांचा दर मिळत आहे. तसंच गाईच्या धारा काढण्यासाठी मिल्किंग मशीन (दूध मशीन) चा वापर करतो. माझ्याकडे सध्या मनुष्यबळ कमी असल्याने मी मिल्किंग मशीनचा वापर करतो. तसंच जनावरांना चारा म्हणून मुरघास देतो. तसंच ऊसाचा हंगाम सुरु झाला की काही दिवस वाढे चारा म्हणून काही प्रमाणात वापरतो. ज्या शेतकऱ्यांनाकडे १० पेक्षा अधिक गाई असतात त्यांना शेतमजूर ठेवावा लागतो. यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी मिल्कींग मशीनचा वापर करावा. आणि मजूर ठेवणे टाळावे. असे मी सांगेन.

खाद्य नियोजन
सध्या दिवसेंदिवस जनावरांना चारा कमी पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चारा नियोजन देखील केले पाहिजे. चाऱ्याचा समतोल राखता आला पाहिजे. म्हणजे हिरवा, कोरडा चारा, पशुखाद्य विविध पेंडीचा वापर करुन जनावरांच्या खाद्य व्यवस्थापन केलं पाहिजे. जर खाद्य नियोजन मजूराकडे असेल तर ते जनावरांना काय घालतात? आपल्या जनावरांला काय, किती प्रमाणात खाऊ घालतो? याची माहिती मालकाला नसते. त्यासाठी मजुरांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसंच चारा नियोजन योग्य असेल तर दूधाचे प्रमाण घटत नाही.

English Summary: Success Story Elevation in milk business along with sugarcane farming Published on: 21 November 2023, 11:54 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters