आपण आपली शेत जमीन छोट छोट्या तुकडयामध्ये केली आहे. तर काही ठिकाणी डोंगराळ भागात छोट-छोट्या पट्ट्यात पीक घेतली जातात. अशीच परिस्थीती असलेल्या शेत जमिनीवर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. येथील १७३ जणांनी २०० एकराच्या शेत जमिनीत सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. दरम्यान हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी तेथील कृषी महाविद्यालय आणि अनुसंधान केंद्रातील शास्त्रज्ञांचा सहयोग या शेतकऱ्यांना मिळाला.
सामूहिक शेतीचं यश
छत्तीसगडमधील भोंड गावातील १७३ शेतकऱ्यांनी एकत्र येत २०० एकर जमिनीत सामूहिक शेती केली. या शेतीत शेतकरी धानासह अन्य इतर पिकांचेही उत्पन्न घेत आहेत. असा प्रयोग आधीही बस्तरमध्ये करण्यात आला होता. मका, हरभरा, गहू, आणि इतर भाज्यांची शेतीसाठी तेथील कृषी शास्त्रज्ञांनी मदत केली. त्यांच्या मदतीमुळे आम्हाला या प्रयोगात यश मिळाले, असे येथील शेतकरी सांगतात. मागील वर्षी शेतकऱ्यांनी कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड केली होती. शेतकऱ्यांनी ३० एकरमध्ये मका, २५ एकरमध्ये हरभरा, २० एकरमध्ये गहू, २० एकरमध्ये भाजीपाला यांचे उत्पादन घेतलं. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शेतजमिनीवर भोंडवासियांनी लागवड केली होती. या योजनेसाठी ७५ लाख रुपयांचा खर्च आला आहे, पण आयुष्यभर येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
अशी तयार केली शेती
सामूहिक शेती करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी शेत जमिनीची निवड केली जेथे शेतकरी व्यवस्थीत शेती करु शकत होते. या शेतीसाठी इंद्रावती नदीच्या पाण्याचा उपयोग करण्यात आला. यासह भटक्या गुरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी कुंपन करण्यात आले.
Share your comments