महाराष्ट्र हे कांदा व द्राक्षे उत्पादनात अख्ख्या भारतात अग्रेसर आहे आणि महाराष्ट्राचे नवजवान शेतकरी हे शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. मग ते आपल्या खान्देशांत सीताफळ पिकवणे असो किंवा मुंबई मध्ये मशरूम शेती करणे असो किंवा ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेणे असो आपल्या राज्यातील नवजवान कुठेच मागे नाहीत. आता तर राजेंद्र पल्ले आणि योगेश जगदाळे यांनी तर कमालच केली असंच म्हणता येईल, हो ना! ज्याचा आपण विचारही करत नाही आणि केला जरी तरी अपयश येईल ह्या भीतीने इम्प्लिमेंट करू शकत नाही अशी ही गोष्ट ती म्हणजे इजरायली टेकनिकने द्राक्षे उत्पादन घेणे.
ह्या रांगड्या नवजवान शेतकऱ्यांनी ह्या टेक्निकचा अभ्यास केला विचार केला आणि प्रत्येक्षात देखील उतरवलं. दोघांनीही इजरायली पद्धतीने शेती केली आणि मोठी कमाई केली. इजरायली टेकनिकने सरंक्षित शेती जर समजा केली तर आपल्याला निसर्गराजाच्या बदलत्या स्वरूपामुळे ऐनवेळी पलटणाऱ्या हवामानमुळे आपल्या द्राक्षे पिकाला नुकसान नाही होणार एवढं मात्र नक्की.
"सोलापूर" नाम तो सुना ही होगा! पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा, सोलापूर जिल्यातील मंगळवेढा तालुक्यातील अजनाळे गावात राहतात हे दोघ नवजवान शेतकरी राजेंद्र पल्ले आणि योगेश जगदाळे. ह्या दोघी नवजवानांनी काहीतरी शेतीत नवीन प्रयोग करायचा अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि त्याकामासाठी तुटून पडले, अनियमित निसर्गामुळे, हवामानमुळे द्राक्षे पिकावर भयंकर विपरीत परिणाम होतात.
विशेषतः गारपीट, मुसळधार पाऊस आणि जास्तीचे तापमान ह्या गोष्टी द्राक्षे उत्पादनात फरक घडवून आणतात. काही वेळेस अक्षरशः शेतकरी बांधव पूर्ण च्या पूर्ण द्राक्षेबाग सोडण्यासाठी मजबूर होऊन जातो. ज्यामुळे साहजिकच आपल्या शेतकरी राजाच मोठ्या प्रमाणात नुकसान होत. परंतु जर आपणही राजेंद्र आणि योगेश यांसारखी इजरायली टेक्निकणे द्राक्षे शेती केली तर आपण नक्कीच ह्या नैसर्गिक अनियमितताला ओलांडून चांगले उत्पादन आणि उत्पन्न संपादन करू शकतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे नेमकी ही टेकनिक? Grape Cultivation
ह्या पद्धतीत संपुर्ण द्राक्षे बागाला इजराईल मध्ये बनलेल्या 160 जीएसएम कागदाणे परिपूर्ण झाकून दिले जाते. ज्यामुळे द्राक्षाचे पीक बदलत्या हंगामात किंवा जोरदार पाऊस, जोरदार वारा, गारपीट आणि कडक तापमान यांसारख्या समस्यांपासून सुरक्षित ठेवता येईल. हा कागद इस्राईलमधून मागवला जातो.
राजेंद्र आणि योगेशने शेअर केला आपला अनुभव
राजेंद्र पल्ले आणि योगेश जगदाळे यांनी सांगितले की, हे तंत्र राज्यात प्रथमच वापरले गेले आहे. जे की त्यांच्या द्राक्ष लागवडीसाठी खूपच फायदेशीर ठरले आहे. जगदाळे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे संपूर्ण द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली होती. परंतु या तंत्रामुळे यावर्षी बागेचे कोणतेही नुकसान झाले नाही. आणि फायदा असा झाला की औषध फवारण्याची गरज उरली नाही कारण की मुसळधार पाऊस बागला लागलाच नाही,यामुळे साहजिकच पैशांची बचत झाली आणि 30 हजार रुपये वाचले.
तर राजेंद्र पल्ले म्हणाले की, या टेक्निकच्या वापरामुळे द्राक्षांचे उत्पादन कित्येक तरी पटीने वाढले आहे. सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा सुरक्षित करण्यासाठी या टेक्निकचा वापर करावा असे आवाहन त्यांनी ह्याप्रसंगी केल.
सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन कुठे होते?
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे द्राक्ष उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर द्राक्षे उत्पादनात नाशिक हे राज्याचे सर्वात महत्वाचे केंद्र आहे. नाशिकचे एकूण द्राक्ष उत्पादनात 70 ते 80 टक्के योगदान आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडूमध्येही द्राक्षेची लागवड केली जाते.
Share your comments