दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने सगळ्याची वाट लागली. यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे उद्योग बंद पडले. कोरोना कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र या काळात हातावर पोट असणाऱ्ऱ्या गरिबांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. तसेच काहींनी हातची नोकरी सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेकांनी या काळात देखील हार न मानता पर्याय शोधून काम केले. असेच काही एका तरुणाने केले आहे. अशाच एका तरुणाने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याला मोठे यश मिळाले आहे.
अक्षय सागर असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. कृषी पदवीधर असलेल्या अक्षय सागरने कोरोना काळात नोकरी सोडली आणि गावी येत केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली. यामध्ये त्याला चांगलेच उत्पन्न मिळाले असून त्याने इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अक्षयने दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे.
अक्षय सागरने 35 गुंठ्यात मल्चिंग व ठिबक सिंचनावर बेड पद्धतीने स्ट्रॉबेरी लावली. स्ट्रॉबेरीची लागण केल्यापासून दीड महिन्यातच उत्पन्न सुरू झाले. एका रोपास सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळत आहे. लागवडीचा खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. मार्केटमध्येच किलोलो 300 रुपयांचा दर मिळत आहे. याचबरोबर शेणखत, रासायनिक खतांचा वापर केल्यायमुळे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम दर्जाचे आले असल्याचे अक्षयने सांगितले. यामुळे आता अनेकजण त्याच्या शेतात भेट देत आहेत.
सध्या जिल्ह्यात अक्षयच्या स्ट्रॉबेरीच्या शेताची चर्चा सुरू आहे. परिसरात ऊस आंबा द्राक्ष याचे पीक असताना हा एक नवीन आणि यशस्वी प्रयोग करण्यात त्याला यश आले आहे. नोकरीला लाथ मारून शेतीत मिळवलेल हे उत्पन्न पाहायला अनेक नागरिक येत आहेत. जिल्ह्यात तरुण वर्गासाठी अक्षयने एक आदर्श निर्माण केला आहे. अक्षयवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकजण चांगली शेती असताना देखील नोकरीच्या मागे लागतात, मात्र असे काही वेगळे केले तर चांगले उत्पन्न मिळू शकते.
Share your comments