सध्या शेती करणे फारच जिकरीचे झाले आहे. अनेकांनी शेती करणेच सोडून दिले आहे. अनेकजण कमी पैशांची नोकरीच करत आहेत. असे असताना मात्र अनेकजण शेतीमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग करत आहेत. असे असताना एका शेतकऱ्याला शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला आणि ऊस शेतीला संजीवनी मिळाली असून उसाच्या फडात बसविलेल्या सौर संचामुळे १२ एकर शेती बहरून आली.
यामुळे या शेतकऱ्यांची चर्चा सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील उच्च पदवीधारक तरूण शेतकरी शुभम उपासनी यांनी हे करून दाखवले आहे. त्यांनी शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेत अर्ज केला. या योजनेत त्यांची निवड होऊन त्यांच्या शेतात ऑक्टोबर २०२१ मध्ये साडेसात अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप बसविण्यात आला. सोलर पंप बसण्यापूर्वी ऊस शेती करतांना कसरत करावी लागत होती. अनेकदा पाण्याची कमतरता भासत होती.
तसेच उन्हाळ्यात वीजेच्या घोळामुळे उसाला पाणी देतांना अनेकदा अडचणी येत होत्या. तसेच अनेकदा डीपी जळणे, आणि इतर कारणामुळे उसाला पाणी देण्यास अडचणी आल्या. असे असताना आता मात्र १२ एकर ऊस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज शक्य होत आहे. त्यामुळे त्यांना आता उसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे.
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. शुभम उपासनी यांनी यासाठी १० टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर संच मिळाला. सध्या दिवसभर हा पंप सुरू असून काहीही अडचणी येत नाहीत. सध्या राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
रिकाम्या पोटी नारळपाणी पिल्याने शरीरावर होतात हे परिणाम, जाणून घ्या, होईल फायदा...
Share your comments