1. यशोगाथा

कृष्णमूर्तींंच्या संगणकावरील बोटांना लागली मधाची गोडी

निसर्ग आणि त्यातील जीव म्हणजे मधमाश्यांनी गोळा केलल्या मधाची गोडी आयटीतील तज्ञ असलेल्या तामिळनाडू मधील करूर जिल्ह्यामधील अरवाकुरुची तालुक्यातील कृष्णमूर्ती पालनिसामी या युवकाला लागली. याच गोडीने झपाटलेल्या या युवकाने बघता बघता खात्रीशीर आणि भक्कम असे उत्पन्न देणाऱ्या मध निर्मितीच्या व्यवसायात जम बसवला आणि पाहता पाहाता देशाच्या कानाकोपऱ्यात आपली नवीन ओळख निर्माण केली. पूर्णपणे ताकदीने या व्यवसायाकडे पाहून यशस्वी आणि अत्याधुनिकपणे बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी हेरले. यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारताबाहेरील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले व यातील अडचण दूर करून रोगमुक्त मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या आणि याच आहेत भविष्यातील उत्तम मधनिर्मिती व्यवसायातील महत्त्वाचा पाया. आजच्या घडीला हा व्यवसाय अनेक शेतकरी युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

KJ Staff
KJ Staff


निसर्ग आणि त्यातील जीव म्हणजे मधमाश्यांनी गोळा केलल्या मधाची गोडी आयटीतील तज्ञ असलेल्या तामिळनाडू मधील करूर जिल्ह्यामधील अरवाकुरुची तालुक्यातील कृष्णमूर्ती पालनिसामी या युवकाला लागली. याच गोडीने झपाटलेल्या या युवकाने बघता बघता खात्रीशीर आणि भक्कम असे उत्पन्न देणाऱ्या मध निर्मितीच्या व्यवसायात जम बसवला आणि पाहता पाहाता देशाच्या कानाकोपऱ्यात आपली नवीन ओळख निर्माण केली. पूर्णपणे ताकदीने या व्यवसायाकडे पाहून यशस्वी आणि अत्याधुनिकपणे बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी हेरले. यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारताबाहेरील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले व यातील अडचण दूर करून रोगमुक्त मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या आणि याच आहेत भविष्यातील उत्तम मधनिर्मिती व्यवसायातील महत्त्वाचा पाया. आजच्या घडीला हा व्यवसाय अनेक शेतकरी युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

विप्रो या नावजलेल्या कंपनीत तामिळनाडूमधील करूनर जिल्ह्यातील अरावाकुरुची तालुक्यातील कृष्णमूर्ती पालनिसामी नावाचे व्यक्ती अभियंता पदावर कार्यरत होते. लठ्ठ पगार आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध. सारे काही आलबेल आणि मनासारखे. याच्याच जोडीला मेहनत आणि जिद्द. त्यामुळेच 2 वर्षानंतर त्यांना बढती मिळून संयुक्त राष्ट्राकडे रवाना होण्याची संधी मिळाली; परंतु त्यांना शेती आणि गावाकडे परतण्याची इच्छा खुणावत होती. तो दिवस त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा होता आणि त्यांनी त्या संधीस आणि कंपनीस राजीनामा दिला आणि एक पिक फुल मधनिर्मिती उद्योजक बनण्याचे ठरविले आणि त्यात त्यांनी आपल्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरविले.


2007 मधील अभियांत्रिकी पदवीधर मधुमक्षिका पालन या उद्योगाकडे वळतो थोडे वेगळेच वाटते; परंतु या मधनिर्मिती उद्योगाच्या अगोदर ते शेअर बाजार गुंतवणूकीचा व्यवसाय करत होतो. परंतु त्यातून अपेक्षित लाभ मिळत नव्हता. म्हणून कृष्णमूर्तीने इतरांचे पैसे गुंतवण्यापेक्षा आपले पैसे एक गुंतवून यशस्वी उद्योजक होण्याचे ठरविले. यासाठी ते जवळ जवळ वर्षभर उद्योग निवडीसाठी फिरत होता आणि शेवटी मधनिर्मिती या उद्योगाकडे वळाले. तामिळनाडूमध्ये पाहायला गेल तर हा दुर्लक्षित विषय पण विशेषत: याचे कृषी, उद्यान, वन क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याचाच अभ्यास करून सुरु झाला मधमाश्यांबरोबरचा प्रवास.

तमिळनाडूतील अरवाकुरुची येथे हानिकार्टची स्थापना करताना प्रथम 3 लाखांची गुंतवणूक करून उभा केला हा व्यवसाय. यात कृष्णमूर्तीचे मित्र कृष्णराज, अरुण, आणि प्रभू यांचे विशेष सहकार्य मिळाले. निसर्ग आणि त्यातील जीव म्हणजे मधमाश्या खात्रीशीर उत्पन्न देत आहेत. चांगले अर्थार्जन होत आहे. हे पहिल्यापासून पूर्ण ताकदीने या व्यवसायाकडे पाहून यशस्वी आणि अत्याधुनिकपणे बदल करणे गरजेचे होते. त्यासाठी हवे होते तज्ञांचे मार्गदर्शन: परंतु असे काही घडले नाही. कृष्णमूर्ती यांनी इंटरनेटचा आधार घेऊन भारताबाहेरील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन यातील अडचणी दूर करून रोगमुक्त मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या.

एक पिक फुल मध निर्मिती

कृष्णमूर्ती यांनी पारंपारिक मधुमक्षिका पालनात बदल करून नुतनीकरनच्या दिशेने एक पिक फुल मधनिर्मिती केली. हा प्रयोग या अगोदर कधीच झाला नाही यासाठी त्यांनी शेवगा, जांभूळ, जवस, सुर्यफुल, केळी, आंबा, कोथिंबीर या पिकांत प्रयोग केले. यातून त्यांना निदर्शनास आले कि, प्रत्येक पिकातील मधाची चव वेगवेगळी आहे. उदा. सुर्याफुलातील मध हा सोनेरी पिवळा तर आंब्यातील गडद लाल रंगाचा असतो. तसेच त्याची चव आणि सुगंधही वेगवेगळा असतो, असे दिसून आले आणि यालाच म्हणतात एक पिक फुल मध.


कृष्णमूर्ती सांगतात, मधमाश्या घेतात त्या बदल्यात काही देतातही म्हणजे परागीभवनाच्या क्रियेतून पाहिले तर नर फुलाकडून परागकण घेऊन मादी फुलाकडून मध देतात. त्या दरम्यान नर  फुलाकडून घेतलेले परागकण मादी फुलाच्या सान्निध्यात जाऊन परागीभवन होते. आणि यात दुवा म्हणून नैसर्गिकरीत्या मधमाश्या काम करत असतात आणि दोन्हीही त्यांचे अन्नपदार्थ आहेत. व नैसर्गिक क्रियेत मधमाश्या कधीही एका पिकाच्या जातीचा नर फुलातील परागकण इतर पिकाच्या जातीच्या मादी फुलात परागीभवन न करता ते त्याच जातीच्या पिकात परागीभवन घडवून आणतात. हे गमक कृष्णमूर्ती यांनी नेमके ओळखून त्याचा पुरेपूर फायदा घेत एक पिक फुल मधनिर्मितीचा एक अनोखा प्रयोग यशस्वी केला. मधमाश्या या एखाद्या फुलात मोठ्या प्रमाणता मध असेल तर ते संपेपर्यंत दुसऱ्या फुलाचा शोध घेत नाहीत आणि याची मदत एक पिक फुल मध निर्मितीला होते.

एक पिक फुल मधाचे फायदे म्हणजे आयुर्वेदिक औषधा बरोबर घेतल्यास गुणकारी आहे. यामुळे आमचे ग्राहक आनंदी आहेत. त्यातीलच एक नवीन प्रयोग लहान बाळांसाठी मधनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेषता: नवीन पोळी असलेल्या मध पेटीतून विशेष लक्ष देऊन काळजीपूर्वक प्रक्रिया केलेला मध निर्माण करून तो 18 महिन्याच्या वयाच्या आतील बाळांना दिला जातो. या दरम्यान विशेष काळजी घेतली जाते. याचबरोबर कोणता दुष्षपरिणाम होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.

कृष्णमूर्ती यांची मधनिर्मिती

मधनिर्मिती मधमाश्याच्या मध गोळा करण्यावर तसेच फुलधारणेचा हंगाम यावर अवलंबून आहे. एका मधपेटीतून 6 दिवसांत 6 किलो मध मिळतो. (मोठ्या प्रमाणात) पूरक फुलधारणा असेल तर मधाचे उत्पादन वाढते. आज कृष्णमूर्ती यांच्याकडे एका दिवसाला २०० किलो मधावर प्रक्रिया करून शुद्ध मधनिर्मिती केली जाते. त्यांनतर तो कॅनमध्ये भरून ठेवला जातो. मागणीप्रमाणे तो काचेच्या बाटलीत भरून विक्रीला पाठवला जातो. ग्राहकला तो हवाबंद बाटलीत साठविण्यास सांगितले जाते. या सीलबंद बाटलीची वैधता 5 वर्ष तर ती फोडल्यानंतर 2 वर्ष इतकी असते. सरासरी मध 250 ग्रॅमच्या बाटलीत उपलब्ध करून दिला जातो.


घरपोच सेवेसाठी मधाचे वितरण करण्यासाठी कृष्णमूर्ती यांनी आपल्या www.honeykart.com या संकेतस्थळावर तसेच आपल्या www.facebook.com/honeykart या फेसबुक पेजवर ग्राहकांसाठी विक्री व्यवस्था केली आहे. तसेच आपल्या संकेतस्थळावर एक पिक फुल मधाचे आरोग्यला होणारे फायदे व पीक निहाय मधाची इत्यंभूत माहिती दिली आहे. अंदाजे या मधाचा दर 716 रुपये किलो इतका आहे. लहान बाळासाठी दिला जाणारा मध याहून महाग आहे. भारतातील ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. यात प्रामुख्याने चेन्नई आणि बंगळूरुचे बरेच ग्राहक आहेत. 90 टक्के ग्राहक हे नियमित ग्राहक आहेत.

मधुमक्षिका पालनातून पिक उत्पादनात अंदाजे 30 टक्क्यांनी वाढ होते, असे दिसून आल्यावर कृष्णमूर्ती यांनी आपल्या मधपेट्या परागीभवनसाठी शेतकऱ्यांच्या शेताकडे वळविल्या. ते म्हणाले, यासाठी तामिळनाडूमधील अनेक ठिकाणाहून शेतकरी संपर्क करता आहेत. त्यांच्या शेतावर फळधारणेच्या काळात मधपेट्या विनामुल्य देतात व हंगाम संपल्यानंतर त्यातून मध गोळा करून पेट्या पुन्हा घेऊन येतात. यात परागीभवनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, तर मला मध मिळतो. हा होतो दुहेरी फायदा. त्याचबरोबर त्यांच्या शेतावर अल्पशा मूल्यात मधमाश्या पालनाचे तंत्रज्ञान यावर प्रशिक्षण दिले जाते. कृष्णमूर्ती या वर्षी मध उत्पादन दुप्पटीने वाढवणार असून, यासाठी त्यांनी नाविन्यता आणून दक्षिण भारतात असलेल्या मसाल्याच्या पिकात मधनिर्मिती करण्याचा प्रयोग करणार आहेत. या प्रयोग यशस्वी झाला तर निसर्गाचा आविष्कारच समजावा लागेल, असे कृष्णमूर्ती सांगतात.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून आपली पावले मध गोळा करण्याकडे वळवली आणि यशस्वी उद्योजक म्हणून तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगत आहे. मी महाविद्यालयीन युवकांबरोबर बोलत असताना उद्योजक बनण्याची त्यांची उमेद मला आत्मविश्वास आणि नवीन प्रेरणा देते. मला एक असा आराखडा तयार करायचा आहे. यात खूप मोठ्या स्तरावर मधुमक्षिकापालन हा उद्योग उभारून एक यशस्वी उद्योजक म्हणून इतरांपुढे आदर्श घडवून द्यायचा आहे आणि यातूनच तुम्ही खूप काही मिळवू शकता आणि यशस्वी उद्योजक होऊ शकता.

संपर्क

कृष्णमूर्ती पालनिसामी
हानीकार्ट मधुमक्षिकापालन केंद्र,
अरवाकुरुची, करुर
तामिळनाडू 639201
www.honeykart.com

English Summary: Software Engineer to beekeeper Honeykart Published on: 26 October 2018, 08:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters