1. यशोगाथा

आगळेवेगळे!केळीच्या सालीपासून तयार केली बूटपॉलिश, जाणून घेऊ वैशिष्ट्ये या बूट पॉलिशचे

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अनेक आगळ्यावेगळ्या कल्पना असतात.परंतु बऱ्याचदा योग्य मार्गदर्शना अभावी अशा कल्पना सत्यात उतरू शकत नाही. परंतु अशा अकल्पित बुद्धी असणाऱ्या तरुणांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले तर अनेक स्टार्टअपउभे राहू शकतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
banana peal

banana peal

 ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अनेक आगळ्यावेगळ्या कल्पना असतात.परंतुबऱ्याचदा योग्य मार्गदर्शना अभावी अशा कल्पना सत्यात उतरू शकत नाही. परंतु अशा अकल्पित बुद्धी असणाऱ्या तरुणांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले तर अनेक स्टार्टअपउभे राहू शकतात.

आपण बऱ्याच बातम्यांमध्ये वाचतो की ग्रामीण भागातील शेतकरीपुत्रांनी  अनेक प्रकारचे यंत्र तयार केली. अशा यंत्राच्या माध्यमातून शेतीशी बरीचशी कामे सोपी झाली आहेत. या लेखात आपण अशाच तरुणांच्या डोक्यातील भन्नाट कल्पना सत्यात कशी उतरली याबाबत माहिती घेणार आहोत.

पुण्याजवळील शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋषिकेश लबडे आणि निखील मगर यांनी केळीच्या सालीपासून बूटपॉलिश तयार करण्याचा आगळावेगळा प्रकल्प तयार केला आहे.

केळीच्या सालीपासून बूट पॉलिश तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. याची नोंद म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उत्कृष्ट नवीन कल्पना म्हणून निवड करण्यात आली आहे.

जाणून घेऊया बूटपॉलिशचे महत्वाची वैशिष्ट्ये

  • विशेष म्हणजे या बूट पॉलिश मध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरण्यात आले नाहीत.
  • या बूट पॉलिशचा उत्पादन खर्च चारशे रुपये आहे.
  • या पॉलिसीची चमक जास्त वेळ टिकते. जवळ जवळ चार दिवसांपर्यंत व्यवस्थितरीत्या हे पॉलिश राहते.
  • या बूट पॉलिश चे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.
  • रासायनिकबूट पॉलिश मुळे कर्करोगाचे दुष्परिणाम संभवतात. मात्र या सेंद्रिय बूटपॉलिश मुळे आरोग्यास धोका नाही.

 

 या बूट पॉलिश मध्ये काळा व तपकिरी असे दोन रंग आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना व संशोधन क्षमता असते. परंतु याला आवश्यक असते योग्य मार्गदर्शनाची. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तर ग्रामीण भागात पूरक संशोधन केल्यास ग्रामीण विद्यार्थी देखील उंच शिखर गाठू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. याबाबत प्राचार्य डॉक्टर के. सी मोहिते म्हणाले की, अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही.

English Summary: school student make a shose polish use of banana year peal of banana Published on: 06 November 2021, 08:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters