भारतात जय जवान जय किसान अशी घोषणा मोठ्या स्वाभिमानाने दिली जाते आणि आपल्याला आपल्या देशाच्या सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा खरंच अभिमान वाटायलाच हवा. अशीच अभिमान वाटावा अशी एक घटना घडली ओडिसा राज्यात. ओडिसा राज्यातील जाजपूरची ही एक मनाला आनंद देणारी गोड बातमी, बॉर्डरवर देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले रिटायर्ड फौजी खिरोद जेना आता देशाची सेवा ही पर्यावरणाचे रक्षण करून करत आहेत, पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून फळझाडे, व इतर झाडांची लागवड करून रिटायर्ड फौजी खिरोद जिना फक्त पर्यावरणाचेच रक्षण नाही करत तर, लोकांसाठी उदरनिर्वाहचे साधन देखील उपलब्ध करून देत आहेत.
रिटायर्ड फौजी आपली वृक्षारोपणाची आवड जोपासत, फळबाग लागवड करतात. जवानच्या ह्या कार्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना फायदा मिळत आहे. रिटायर्ड फौजीनी आजूबाजूच्या परिसरात अनेक फळांची बाग लावली आहेत, त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडांमुळे तेथील आजूबाजूच्या परिसरातील माणसाचे उदरनिर्वाह भागत आहे. गेली 15 वर्षांपासून लावल्या गेलेल्या त्यांच्या ह्या फळबागांमुळे अनेक कुटुंबाची चुल्ही जळत आहेत. रिटायर्ड फौजी ह्यांचे 1 लाख फळांची झाडे लावण्याचा संकल्प आहे आणि ह्या कार्यात ते अहोरात्र झटत आहेत.
सकाळी सकाळी घरातून रोपे घेऊन निघतात...
आपण कामाला जाण्यासाठी निघतो तो टिफिनचा डब्बा घेऊन आणि जे लोक ऑफिसला जातात ते त्यांच्या बॅगमध्ये लंच बॉक्स ठेवून ऑफिसला निघतात, पण रिटायर्ड फौजी खिरोद जेनाची सकाळ सुरु होते ती झाडांच्या रोपांनी भरलेल्या बॅगने, खिरोद जेना सकाळी रोपे घेऊन निघतात आणि दिवसभर वृक्षरोपण करतात. खिरोद जेना रोज सकाळी सहा वाजता आपल्या दुचाकीवर झाडांच्या रोपांची पिशवी घेऊन मोकळ्या जमिनीच्या शोधात निघतात. योग्य जागा शोधल्यावर रिटायर्ड फौजी एक रोपटे लावतो आणि गुरांपासून संरक्षणासाठी बांबूचे कुंपण लावतो. गेली 16 वर्षे त्याची ही एकच दिनचर्या आहे कधीही खंड पडू दिलेला नाही आणि फौजी अजूनही खचलेले नाहीत त्यांना अजून नवनवीन झाडे लावायची आहेत.
फौजींनी आतापर्यंत चक्क 20,000 फळझाडे लावली....
बाराछना ब्लॉकमधील कलाश्री गावातील रहिवासी 54 वर्षीय जेना माजी सैनिक आहेत आणि जाजपूरला हरित बनवण्याच्या मोहिमेवर आहेत. 2005 मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून, जेना यांनी बाराचाना ब्लॉकच्या 11 गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर आंबा, पेरू, जामुन आणि जांभळासह 20,000 फळझाडे लावली आहेत. यावर्षी पावसाळ्यात त्यांनी फळांच्या झाडांची 600 रोपे लावली आहेत.
फौजींनी घेतली शिक्षकांकडून प्रेरणा...
स्थानिक शिक्षक किशोर चंद्र दास यांच्या प्रेरणेने रिटायर्ड फौजी जेना यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर झाडे लावण्याचा निर्णय घेतला, असे न्यू इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. किशोर चंद्र दास ह्या शिक्षकांने या भागात असाच एक उपक्रम सुरू केला होता, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जेना ह्यांनी ही मोहीम सुरु केली आणि त्यांना एक लाख फळझाडे लावायची आहेत.
रिटायर्ड फौजी जेना म्हणाले की, "1985 मध्ये जेव्हा मी भारतीय लष्करात सामील होण्यासाठी माझे गाव सोडले तेव्हा तेथे शेकडो झाडे होती. पण जेव्हा मी 20 वर्षांनंतर परतलो, तेव्हा मला आढळले की संपूर्ण परिसराची हिरवळ नाहीशी झाली आहे." म्हणुन त्यांनी हा झाडे लावण्याचा अट्टहास उरी बाळगला आहे आणि त्यांना आशा आहे की हा त्यांचा अट्टहास त्यांच्या परिसरातील गेलेली हिरवळ परत आणून देईल.
फौजीमुळे होतोय आसपासच्या लोकांचा फायदा
रिटायर्ड फौजी आपल्या पेन्शनच्या रकमेने या त्यांनी लावलेल्या झाडांची देखभाल आणि संगोपन करतो. फौजी आपल्या पेन्शनमधून दरमहा 10,000 रुपये रोपे, लागवड आणि कुंपण साहित्य, खते आणि खाद्य खरेदी करण्यासाठी खर्च करतात.
रिटायर्ड फौजी म्हणाले, “मी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या झाडांना फळे येऊ लागली आहेत आणि स्थानिक लोक ह्या झाडांचे आंबे गोळा करून ते बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करतात. रिटायर्ड फौजीचे लक्ष्य आहे एक लाखाहून अधिक फळझाडे लावण्याचे आणि तोपर्यंत त्यांना कोणीही रोखू शकत नाही असा रिटायर्ड फौजीना विश्वास आहे.
Share your comments