1. यशोगाथा

व्वा रे पठ्ठया! बँकेची नोकरी सोडून सुरु केली शेती, आज पगारापेक्षा चारपट पैसे कमवतोय

दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगावर कोरोना नामक महाभयंकर सावट आले होते, या महाभयंकर महामारी मुळे संपूर्ण जग जणू काही थांबलंच होतं. धोरणामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आले होते, भारतात देखील लॉकडाउन लावण्यात आले होते. कोरोना मुळे अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या, त्यामुळे गावी परतले. काही लोक नोकरी असून देखील गावाकडे परतले. अनेक लोकांनी गावाकडे छोटा-मोठा रोजगार शोधला, काही लोकांनी व्यवसाय सुरू केला तर काहींनी शेती क्षेत्रात पाऊल ठेवला.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
guava farming

guava farming

दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगावर कोरोना नामक महाभयंकर सावट आले होते, या महाभयंकर महामारी मुळे संपूर्ण जग जणू काही थांबलंच होतं. धोरणामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आले होते, भारतात देखील लॉकडाउन लावण्यात आले होते. कोरोना मुळे अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या, त्यामुळे गावी परतले. काही लोक नोकरी असून देखील गावाकडे परतले. अनेक लोकांनी गावाकडे छोटा-मोठा रोजगार शोधला, काही लोकांनी व्यवसाय सुरू केला तर काहींनी शेती क्षेत्रात पाऊल ठेवला.

या कोरोना नामक महाभयंकर आजारामुळे काही घटना खुप वाईट घडल्यात तर काही घटना ह्या खुप चांगल्या घडल्यात. आज आपण अशाच एका पॉझिटिव्ह घटने विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील शहजादपूर गावाचे रहिवासी कपिल यांची दिलचस्प कहानी जाणून घेणार आहोत.

कोरोना येण्याच्या अगोदर शहजादपुरचे कपिल सोनिपत मध्ये बँकेत नोकरी करत होते, त्यांना बऱ्यापैकी मानधन देखील प्राप्त होत होते. पण कोरोना आल्याने सर्व होत्याचं नव्हतं झालं. लॉकडाउन संपल्यानंतर सर्व जग पूर्वपदावर येत होते, पण कपिल यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली, त्याचं झालं असं की लॉकडाउन नंतर कपिल यांचे ट्रान्सफर गुजरात मध्ये करण्यात आले. त्यामुळे कपिल यांनी गुजरात मध्ये जाणे टाळले, आणि आपल्या गावाकडे जाऊन शेती करणे पसंत केले. कपिल हे जैविक पद्धतीने शेती करू लागले. त्यांनी आपल्या शेतात पेरूची लागवड केली आहे व ते जैविक पद्धतीने यातून चांगली मोठी कमाई करत आहेत. कपिल आज बँकेत असताना मिळत असलेल्या मानधनापेक्षा चार पटीने अधिक पैसा कमवीत आहेत.

कपिल आपल्या शेतात एकूण आठ प्रकारच्या पेरूच्या जातीचे उत्पादन घेतात. कपिल यांच्या शेतात उत्पादित केलेल्या पेरूची क्वालिटी ही ताईवानच्या पेरूपेक्षा देखील अधिक चांगली असल्याचे सांगितले जाते. कपिल हे आपला माल बाजारात देखील विक्रीसाठी नेत नाहीत. व्यापारी त्यांच्या शेतात येऊन पेरू खरेदी करून घेऊन जातात. कपिल सांगतात की, त्यांनी नोकरीचा त्याग केल्यानंतर जैविक पद्धतीने पेरूची शेती केली. आणि आता ते या पेरूच्या शेतीतून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्या पंचक्रोशीत कपिल यांच्या यशाची चर्चा चांगलीच गाजत आहे, कपिलच्या मते पेरू लागवडी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी अनेक युवक लांबून त्यांच्या घरी येतात आणि कपिल देखील त्यांना चांगले मार्गदर्शन देतात.

English Summary: resigns from bank job and now earning from guava farming Published on: 23 December 2021, 09:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters