कोरोनाकाळात बऱ्याच लोकांचा रोजगार हातचा गेला. परंतु याच कोरोना काळाने अनेक संधी देखील निर्माण केल्या. बऱ्याच लोकांना हे संकट एका संधितरूपांतरित करण्याचा मार्ग सापडला. अशा परिस्थितीमध्ये मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील जनजीवन या गावातील शुभम चव्हाण यांनी जे काही हटके काम केले त्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
संकटात शोधली संधी
शुभम चव्हाण यांनी गोहाटी आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन ची पदवी घेतली आहे. बरेच करून अशा प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे धावतात. अशाचप्रकारे शुभम यांनी 2017 मध्ये सहा महिने जगातील नामांकित आयटी कंपनी असलेल्या एक्सचेंजर मध्ये नऊ लाख रुपये वार्षिक पॅकेज वर नोकरी केली. त्या माध्यमातून त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले एकूण 50 लाख रुपयांचे कर्ज फेडले. परंतु नोकरी करीत असताना शुभम यांना कायम मनात वाटायचे की नोकरीमध्ये ते हवे तेवढे खुश नाहीत. म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या गावी परत आले. शुभम यांचे वडील ड्रायव्हर आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची होती.
घरी येऊन धरला शेतीचा रस्ता
त्यानंतर त्यांनी घरी येऊन वडिलांशी चर्चा केली आणि त्यांच्या घरची चार एकर जमिनीवर पॉलिहाऊस स्थापन केले. या पॉलिहाऊस च्या माध्यमातून त्यांनी शेती करणे सुरू केले आणि दोन वर्षानंतर 16 ते 18 लाख रुपयांची शिमला मिरची आणि खीरा यांचेबंपर उत्पादन घेतले. आता ते इंदोर सोबतच, जयपुर,दिल्ली, वडोदरा आणि अहमदाबाद येथील भाजी पाला मार्केटमध्ये ॲडव्हान्स बुकिंग घेतात. शेतीसाठी बँकेकडून घेतलेले पन्नास लाख रुपयांचे कर्ज त्यांनी अवघ्या दोन वर्षात अर्धे फेडले. एक एकर मध्ये उभारलेल्या पॉलिहाऊसमध्ये ते वर्षाला 150 टन खिरा आणि काकडीचे उत्पादन घेतात.जमिनीची गुणवत्ता टिकविण्यासाठी ते रोटेशन पद्धतीनेखिरा आणि शिमला मिरचीची लागवड करतात.
जबाबदारीने दाखवला शेतीचा रस्ता
शुभम बोलताना सांगतात की,स्वतःच्या गावांमध्ये काही करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या घरात एक छोटा भाऊ, एक लहान बहिण आहे.
शुभम मोठे भाऊ असल्याने घराची जबाबदारी देखील शुभम यांच्यावर होती. शेती करत असताना लॉकडाऊन लागल्यानंतर बाजारपेठा देखील बंद होते. अशा परिस्थितीत बँकेचे हप्ते भरणे देखील जिकिरीचे होते.परंतु शुभम यांनी हार न मानता शहरांमध्ये जसे अनलॉक झाले त्यानंतर पॉलिहाऊस उभारणी केली आणि त्यामध्ये खीरा,काकडी आणि शिमला मिरचीचे उत्पादन घेतले.व त्याद्वारे चांगले उत्पन्न मिळवले व या उत्पादनाच्या माध्यमातून बँकेचे लोन देखील फेडले.शुभम यांच्याविषयी त्यांची आई संतोष चव्हाणम्हणतात की, आम्हाला कुठल्याही प्रकारची आशानव्हती चेतन चा मुलगा शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेऊ शकेल.परंतु त्याने ते करून दाखवले.
Share your comments