1. यशोगाथा

मानलं लेका तुला…! सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचा जॉब सोडला अन गाढवं पालन सुरु केले, आज तब्बल 17 लाखांची कमाई, वाचा सविस्तर

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Successful Farmer

Successful Farmer

Successful Farmer: नोकरी मिळवण्यासाठी, लोक अभ्यास करतात आणि नंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागतात आणि नोकरीसाठी कायम उत्सुक राहतात, त्या नोकरीला एका माणसाने लाथ मारली कारण त्याला गाढव पाळायचे होते. 

मात्र, या उपक्रमाचा त्यांना पूर्वीपेक्षा अधिक फायदा होत असल्याने सध्या या माणसाची मोठी चर्चा रंगली असून आश्चर्य व्यक्त होत आहे. ही गोष्ट कर्नाटकातील श्रीनिवास गौडा यांची आहे.

42 वर्षीय श्रीनिवास गौडा यांनी गाढवं पालणाचे अनोखे काम करून देशभरात नाव कमवले आहे. 8 जून रोजी त्यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावात जाऊन गाढवे पाळण्यासाठी फार्म उघडले. कर्नाटकातील गाढवांचे पालनपोषण करणारे हे पहिले फार्म आहे.

खरं तर हे देशातील दुसरे आहे. यापूर्वी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात गाढवे पाळण्यासाठी फार्म उघडण्यात आले होते. श्रीनिवास गौडा यांनी अंडररेटेड गाढवांच्या मदतीने एक फायदेशीर व्यवसाय सुरू केला आहे.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख गुंतवा आणि 1 कोटी मिळवा; कसं ते जाणुन घ्या

गाढवांसाठी सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले श्रीनीवास गौडा पूर्वी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचे. नंतर नोकरी सोडून 2020 मध्ये इरा गावात सुमारे 2.3 एकर जागेत गाढव पाळण्यास सुरुवात केली. पूर्वी ते येथे शेती करायचे आणि इतर काही प्राणी पाळायचे.

ससे, कोंबड्यांसह 20 गाढवे येथे आणण्यात आली. गाढवे शोधण्यातही अडचण आल्याचे ते सांगतात कारण आता त्यांचा काही उपयोग नाही. गाढवाच्या दुधात किती गुणधर्म आहेत हे माहीत नसल्याने लोकांनी त्याच्या कामाची खिल्लीही उडवली.

दुधाच्या लाखो रुपयाच्या ऑर्डर्स मिळाल्या 

श्रीनिवास गौडा यांच्या मते, गाढवाचे दूध चवदार, महाग आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आता ते पॅकेजिंग करून विकणार आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गाढवाचे 30 मिली दूध 150 रुपयांना विकले जाते.

गौडा त्याची पॅकेट्स बनवतील आणि मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटला पुरवतील. ब्युटी प्रोडक्टमध्येही याचा वापर होतो, त्यामुळे ते थेट विक्री करणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्याच्याकडे 17 लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच आल्या आहेत. विचार करा, ज्या प्राण्याला लोक कोणाच्याही उपयोगाचे मानत नाहीत, त्याची किंमत किती आहे.

English Summary: Quit software engineering job and started donkey breeding, earning Rs 17 lakh today Published on: 14 June 2022, 05:17 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters