1. यशकथा

घेतले लाल भेंडीचे उत्पादन मध्यप्रदेश मधील शेतकरी झाला मालामाल

red ladyfinger

red ladyfinger

भारतीय शेतकरी आता शेतीच्या बाबतीत चांगल्या प्रकारे जागरूक आणि सुजान होत आहेत. नवनवीन पिके आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यात आपली आवड आणि उत्साह दाखवत आहेत. शेती उत्पादनात वाढ होऊन चांगला नफा मिळावा यासाठी पिकांच्या वेगवेगळ्या प्रगत जातींचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवीत आहेत.

.तसेच सरकार सुद्धा शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करीत आहेत जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. या लेखामध्ये आपण मध्य प्रदेश मधील असलेले शेतकरी ज्यांनी लाल भेंडी ची लागवड करून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या यशस्वीतेबद्दल जाणून घेणार आहोत.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाल पासून जवळ असलेल्या खजुरीकला गावाचे शेतकरि मिश्रीलाल यांनी त्यांच्या शेतात लाल भेंडीची लागवड केली आहे. त्यांनी केलेल्या या शेतीला पाहण्यासाठी लाल भेंडी बद्दल माहिती घेण्यासाठी दूर दूर ठिकाणाहून शेतकरी येत आहेत. याबाबत बोलताना शेतकरी मिश्र लाल यांनी सांगितले की सामान्य भेंडी पेक्षा लाल भेंडी लागवडीच्या माध्यमातून त्यांना जास्त फायदा होत आहे. बाजारामध्ये सामान्य भेंडी ही जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत विकली जाते. परंतु लाल भेंडी चा फायदा असा आहे की, कधी कधी ही भेंडीबाजारात 800 रुपये प्रति किलोपर्यंत विकली  गेली आहे. याविषयी बोलताना म्हणाले की त्यांनी केलेली गुंतवणूक एकच बसून झाली असून आता फक्त शुद्ध नफा त्यांना मिळत आहे.

 

 लाल भेंडी लागवडीची सुरुवात कशी केली?

 लाल भेंडी लागवडची कल्पना कशी आली याबद्दल बोलताना मिश्रीलाल यांनी सांगितले की,  एका वेळी ते वाराणसी जवळ असलेल्या केलाबेलामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च येथे गेले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी कृषी तज्ञांकडून लाल भेंडी चे आर्थिक आणि आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती घेतली. मिश्रीलाल यांनी एक किलो लाल भेंडीचे बियाणे खरेदी केले आणि आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली.आज बाकीच्या शेतकऱ्यांसाठी ते एक प्रेरणा आहेत.

 लाल भेंडी आहे आरोग्यासाठी फायदेशीर

 लाल भेंडीमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि आयर्न जास्त प्रमाणात असते.आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. 

या लाल भेंडी चा स्वाद सुद्धा सामान्य भेंडी पेक्षा वेगळा आहे. सध्या स्थितीत लोक आरोग्यासंबंधी असलेल्या समस्या व जागरूकता याबद्दल संवेदनशील झाल्यामुळे लोकही भेंडी हातोहात खरेदी करतात. तसेच भेंडी शिजण्यासाठी फार कमी वेळ लागतो व सामान्य भेटीच्या तुलनेत उत्पादन खर्च फार कमी आहे म्हणजे सहाजिकच या भेंडीच्या  लागवडीतून चांगला नफा मिळतो.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters