ऊस उत्पादक शेतकरी सध्या शेतात उसाचे मोठ्या प्रमाणावर टनीज काढत आहेत. आता कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष येथील संकेत जयकर मोरे या शेतकर्याने 100 गुंठ्यात 350 मे. टन एकरी 140 मे. टन ऊस उत्पादन घेतले आहे.
त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे. यामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श शेतकरी बनले आहेत. ऊस उत्पादक उत्पादन वाढावे यासाठी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊसविकास व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जात आहे.
कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत
यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात. शेतकऱ्यांना माफक दरात जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंपोस्ट खते पुरविली जातात. यामुळे उसाचे उत्पादन कसे वाढवावे हे समजते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप!!
या योजनेत सहभागी झालेले शेतकरी संकेत मोरे यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. यामुळे त्यांचा ऊस बघण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
दोन वर्षांपूर्वी शरद पवारांचा शब्द आणि आज राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी
गुजरातमध्ये भाजपच नंबर वन! चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री? चर्चांना उधाण
धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शिल्लक ठेवले फक्त धड...
Share your comments