सध्या अनेक शेतकरी हे पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तसेच वेगवेगळी पिके घेत आहेत. आता हिंगणघाटमधील कात्री येथील प्रयोगशील शेतकरी महेश पाटील यांनी कंपनीतील नोकरी सोडून पाऊण एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
उष्ण कटीबंधीय वातावरणात स्ट्रॉबेरीची लागवड करुन पाटील यांनी सर्वांपुढे हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी शेतीची मशागत करून कंपोस्ट खत शेतामध्ये फेकले आणि रोटावेटर करून तीन-तीन फुटावर बेड तयार केले.
त्यांनी निंबोळी पेंट, कंपोस्ट खत आणि 5 किलो गुळाच्या पाण्याचे द्रावण बेडवर शिंपडले. स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केल्यानंतर 35 दिवसांनी फुले यायला सुरुवात झाली. 50 ते 55 दिवसात फळ यायला सुरुवात झाली. 70 व्या दिवशी फळ परिपक्व झाले. यानंतर याची विक्री सुरू झाली.
भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी थांबवायची असेल तर पुरवठा प्रक्रिया साखळी करा सक्षम
वर्धा बाजारपेठेमध्ये 100 रुपये प्रमाणे एक डबा या दराने पाटील विक्री करत आहेत. त्यांच्या स्ट्रॉबेरीची विक्री यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये होत आहे. अनेक शेतकरी हे त्यांच्या शेतात भेट देत आहेत.
ऊस उत्पादकांची वास्तवता, शेतकऱ्यांनो हा लेख तुमच्यासाठी..
त्यांच्या एका स्ट्रॉबेरीच्या फळाचे वजन 30 ते 40 ग्रॅम इतके आहे. हे फळ ते झाडालाच पिकून देत असल्यामुळे या स्ट्रॉबेरी मध्ये गोडी खूप जास्त आहे. यामुळे याला मागणी देखील जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या;
बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनास सुरुवात, कृषिमंत्र्यांसह अजित पवार राहणार उपस्थित
मातीची जैविक क्षमता टिकवणे आज महत्त्वाचे
शिंदे सरकारने शब्द पाळला! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
Share your comments