नाशिक: आज आपण पाहत आहोत की, महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांनी आज अनेक क्षेत्रात विशेष कामगिरी करून एक नवा इतिहास रचला आहे. अशीच एक आपण आज सावित्रीच्या लेकींची कहाणी जाणून घेणार आहोत...
महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी नाशिकच्या सिन्नर येथे युवा मित्र संस्थने नाबार्ड प्रोड्युस फंड अंतर्गत संस्था 2016 रोजी स्थापन करण्यात आली. सिन्नर येथील युवा मित्र संस्थेने स्थापन केलेल्या राज्यातील पहिल्या सावित्रीबाई फुले शेळीपालन संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
10 हजार महिला सभासद संख्या असलेली या संस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचे कार्य होत आहे. शेळीचे दूध, तूप, चीज, लेंडी खत आदींचा व्यवसाय करत आज संस्था वार्षिक एक करोडची उलाढाल करत आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेंतर्गत मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर...
या कारणासाठी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली
युवा मित्र संस्थने नाबार्ड प्रोड्युस फंड अंतर्गत संस्था 2016 रोजी स्थापन करण्यात आली. व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे, शेळ्यांचे वजनावर आधारित श्वाश्वत खरेदी विक्री व्यवस्था उभी करणे, शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून महिला व युवकांना श्वाश्वत उपजिविकेची संधी निर्माण करून देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे.
शेळीपालन व्यवसायाचे उत्पादक आणि उत्पन्न वाढवणे व त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे. शेळी पालन करणाऱ्या महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करणे. तसेच शेतकऱ्यांचे या दृष्टिकोनातून संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात आली होती.
शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! संकटावर मात करत शेतकरी पुत्र झाला 'आयएएस'
संस्थेची यशस्वी वाटचाल
1. 2016 मध्ये सावित्रीबाई फुले शेळी पालन संस्थेची स्थापना करण्यात आली.
2. सुरुवातीला 100 महिला या संस्थेला जोडल्या गेल्या होत्या.
3. आज कंपनी 100 गावामध्ये काम करत असून त्यात महिला सभासदांची संख्या 10 हजार वर जाऊन पोहचली आहे.
4. सुरुवातीला महिलांना योग्य मोबदला मिळावा म्हणून शेळ्यांची खरेदी- विक्री भर देण्यात आला.
5. संस्थेच्या माध्यमातून शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती याबाबत माहिती व्हावी म्हणून केंद्र सुरू करण्यात आले. या माध्यमातून महिलांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
6. शेळ्यांच्या चारा आणि शेळ्यांच्या लेंड्यापासून गांडूळ खत निर्मीती करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
7. महिलांना चांगला रोजगार मिळत आहे.
8. संस्था एवढावरच न थांबता 2019 पासून शेळी दूध व्यवसाय सुरू करण्यात आला.
9. आता पुढे जाऊन दुधापासून चीज निर्मिती करण्यात आली. याला देखील बाजारात मोठी मागणी दिसून आली.
चीजसाठी विशेष प्रोसेसिंग
संस्थेकडून गावपातळीवर शेळी दूध संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेत. तेथे दुधाचे संकलन करून ते प्लांटमध्ये आणले जात यानंतर लॅबमध्ये दूधाची शुद्धता तपासली जाते. जे दूध चीजसाठी योग्य आहे. अशाच दुधावर प्रक्रिया करून चीज निर्मिती केली जाते. यानंतर त्याचे पॅकिंग करून ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते.
संस्थेचे पुढील उद्दिष्ट
1. शेळीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मास यावर प्रक्रिया करून देशात व परदेशात विक्री करणे.
2. शेळीच्या दुधाची पावडर करून त्याची विक्री करणे.
3. शेळीच्या कातडीपासून विविध वस्तू तयार करणे व त्यांची विक्री व्यवस्थापन निर्माण करणे.
4. शेळीच्या लेंडीचे कंपोस्ट खत तयार करणे व त्याची विक्री करणे हे कंपनीच्या भविष्यातील उद्दिष्ट आहेत.
Share your comments