शेतकरी आंदोलनाचे जनक

12 December 2018 07:54 AM


शेतकरी संघटनेचे संस्थापक, जेष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांची आज, 12 डिसेंबर रोजी पुण्यतिथी त्या निमित्य शेतकरी चळवळीतील मुक्त कार्यकर्त्यांच्या या भावना.

आयुष्याचे 38 वर्ष ज्यांच्या सोबत समृद्ध जगणे जगलो तो किसान महानायक शरद जोशी यांचे आज पुण्यस्मरण. कृषीप्रधान, स्त्रीप्रधान, श्रमप्रधान या त्रिसूत्राचा संबंध शेती शोषनात कसा दडलेला आहे, हे आंदोलनाच्या अभिनव क्रियाशीलतेतून शरद जोशी सरांनी सिद्ध करून दाखविले. भारतीय अर्थव्यवस्था शेतीप्रधान असली पाहिजे हे त्यांनी स्वतः प्रयोगानिशी सिद्ध केले. शेतीविरोधी धोरणे, शेतीविरोधी कायदे, विरोधाभासी स्थिती त्या पुराव्यानिशी शेतकऱ्यांसमोर मांडली. स्वतंत्र भारत आंदोलनावर शेतीकारणाचा प्रचंड प्रभाव होता. शरद जोशींनी आंदोलनाला महात्मा गांधींचे रूपक वापरले. पहिल्या व दुसऱ्या शेतकरी स्वातंत्र्यलढ्यातील साम्य विशद केले.

भारताच्या स्वतंत्र आंदोलनातील क्रियाशील प्रतीक चरखा हा शेती मधल्या कापसाचे महत्व वाढविणारा ठरला. एकूण गांधीजींच्या दैनंदिन श्रम उपासनेत चरखा हा अविभाज्य भाग बनला. देशाच्या स्वतंत्र लढ्याचा आणि शेतीच्या स्वातंत्र्याचा असा इतका दाट संबंध होता. कापसावर होणाऱ्या चरखा प्रक्रियेतून कृषीप्रधान देशाची अर्थ व्यवस्था कशी प्रबळ होऊ शकते  हे भारतीय अर्थसत्य महात्मा गांधींना उमजले होते. गांधीजी हे असे जागतिक नेते होते, की बॅरिस्टर असतानासुद्धा ते स्वतःची स्वतंत्र ओळख शेतकरी म्हणून देत. यासंबंधीचे अनेक पुरावे आहेत. यंदाचे वर्ष हे महात्मा गांधीचे १५० वे जन्मशताब्दी वर्ष आहे. शेती प्रश्न कायम उपेक्षित राहिला आहे. आजही उपेक्षित आहे.

शरद जोशी हे निळ्या पॅण्टमधील गांधीच. त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्योत्तर लढ्याला "शेतकरी स्वातंत्र्याची दुसरी चळवळ" असे नामकरण केले. तीन तपापर्यंत शेतीयुद्ध चालविले. हा बुद्धमार्ग वैचारिक अन अहिंसक होता, पण अहिंसेची शपथ घेणाऱ्या छातींवर व्यवस्थेने गोळ्या चालविल्या. शाहिद शेतकऱ्यांचे हात बांधून होते. हा अहिंसक शेतकरी आंदोलनाचा परमोच्च होता.

संयुक्त राष्ट्राची मोठ्या पगाराची नोकरी सोडून आलेल्या या निळ्या पॅण्टतील गांधीने म्हणजेच शरद जोशी यांनी आयुष्यभर आपली ओळख शेतकरी अशीच दाखविली आणि शेतात ते राबलेही ही त्यांची शेतीश्रम उपासनाच म्हणावी लागेल. गांधीजींनी सर्व प्रथम फिनिक्स आश्रमाची स्थापन केली. फिनिक्स आश्रमाच्या उभारणीसाठी कॅलनबाख, पुतने छगन, मगन, हेर्न्स पोलाक, मिली पोलाक सारख्या अनेक सहकाऱ्यांचा सहभाग होता. याच फिनिक्स आश्रमात दिवसभर शेतीमातीची कामे व सोबतच "इंडियन ओपिनियन" वृत्तपत्रासाठी खिळे जुळवणीचे काम सुद्धा आश्रमवासीच करायचे. सर्व भाषांचे ज्ञान व अर्थकारणी निमांसा श्रमिक अनुभुतीमधून सिद्ध करणे हे आश्रमाचे मूल्य.

शरद जोशी सरांनी स्वित्झर्लंडची नोकरी सोडून सर्वप्रथम आंबेठाणला शेती विकत घेतली. शेतमातीमध्ये प्रचंड कष्ट उपसले. फायद्याची शेती करण्याचे अनेक प्रयोग केले. या श्रमनिष्ठ शेतीमाती प्रयोगातूनच शेती शोषणाचा बहू आयामी शोध समोर आला. तो शेतीत्रस्त अनुभव शरद जोशी सरांनी आपल्या आपल्या पुरताच मर्यादित न ठेवता शेती, शेतकरी, उत्थानासाठी सर्वश्रुत केला. अंगार आंबेठाणच्या शेतीत शेती बिजा सोबतच शेती क्रांतीचीही बीजे रोवली गेली. या आंबेठाणच्या शेतीचे रूपांतर अंगारमळा म्हणून झाले. या अंगरमळ्यातूनच शेती क्रांतीचा अंगार ओकायला सुरवात झाली. याच अंगारमळ्याने इतिहासाच्या अनादी काळापासुन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगारीची व वेदनेची प्रखर जाण करून दिली. हाच अंगारमळा जगाच्या शेतकऱ्यांचा अंगार आश्रम ठरला.

अंगार आश्रमाचे तत्व, तर्क, तंत्र सांभाळण्याची मुख्य धुरा मुख्य भुमिका प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी कॅलनबाख सारखी आपल्या अंगाखांद्यावर पेलली. 'शेतकरी संघटक' या वृत्तकामधून शेतीमातीचे ऐतिहासिक वास्तव जगासमोर आणले. महात्मा गांधीजींच्या "इंडियन ओपिनियन" प्रमाणे. भारताच्या बहिष्कृत शेतीचा इतिहास जगासमोर मांडला. किसान महानायक शरद जोशी सरांचा शब्दनशब्द किसान ज्ञानकोषात, शेती ज्ञानकोषात ज्ञानबद्ध केला. याच सर्व श्रेय प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनाच जाते.

सदाग्रह, चरखा, सत्याग्रह ही स्वातंत्र्य चळवळीची साधन संहीता प्रथम दर्शनी गांधीजींची वाटत असली तरीही सदाग्रह, चरखा सत्याग्रह मगन गांधींनी महात्मा गांधीजींना पुरविलेली शब्द साधने आहेत मगन गांधींच्या अकाली मृत्यूवर मा. गांधीजींनी 'आश्रमाचा प्राण गेला' असा अग्रलेख लिहिला होता. त्याच प्रमाणे हुबेहूब अंगरमळ्याचे सुरेशचंद्र म्हात्रे सर प्राण होते आहेत. त्यांच्या सोबत अमर हबीब, चंद्रकांत वानखडे, सुधाकर जाधव, विनय हर्डीकर यांसारखी प्रतिभावंतांची मोठी मांदियाळी होती. ज्यांनी हा शेतकरी चळवळीचा अर्थ विचार प्रवाहीत ठेवण्याचे कार्य केले.

गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षी आणि शरद जोशी यांच्या तृतीय पुण्यतिथी वर्षी या महानायकाची आठवण हीच शेती आणि शेतकरी स्वातंत्र्याची प्रेरणा आहे. विनम्र अभिवादन.

श्री. विजय यशवंत विल्हेकर
ता. दर्यापूर जि. अमरावती 

शरद जोशी शेतकरी संघटना sharad joshi shetkari sanghtana आंबेठाण अंगारमळा angarmala ambethan
English Summary: Parents of Framers Movement

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.