सध्या तरुण पिढी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत आहेत. शेती(farming) करण्यासाठी योग्य नियोजन तंत्रज्ञानाची जोड आणि खत आणि पाणी पुरवठा या सर्वात महत्वाचा गोष्टी आहेत. त्यामुळे याचा वापर करून आपण सुद्धा शेतीमधून बक्कळ नफा मिळवू शकतो.
रासायनिक नाही तर सर्व सेंद्रिय खतांचा वापर:
मराठवाड्यातील बहुतांशी शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग अजिबात करत नाहीत. नवनवीन प्रयोग करण्यासाठी येथील शेतकरी घाबरतात त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग रब्बी आणि खरीप हंगामातली पिके घेऊन शेती करतात. खानापूर मधील गजानन कराळे हे नेहमी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये केसर आंब्याची लागवड केली या झाडांसाठी गजानन कराळे यांनी रासायनिक नाही तर सर्व शेंद्रिय खतांचा वापर केला.
हेही वाचा:खरिप हंगामात करा या औषधी वनस्पतीची लागवड आणि मिळवा 7 पटीने फायदा
एक एकर केसर आंब्याच्या बागेची जोपासना करून गजानन कराळे यांनी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात गजानन कराळे चांगलेच गाजले आहेत. शिवाय यंदा च्या हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती चे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटले आहे.गजानन कराळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये इस्रायल पद्धतीने लागवड केली आणि बागेची योग्य जोपासना केली. पाणी खत व्यवस्थापन यांच्यावर भर देऊन त्यांनी केशर आंब्याची बाग फुलवली.
आंबा लागवड आणि व्यवस्थापन:-
बागेची लागवड करणे म्हणजेच योग्य उत्पन्न मिळेल असे नाही. जर का उत्पन्न चांगले मिळवायचे असेल तर व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे खूप गरजेचे आहे. गजानन कराळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 650 आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. त्या सर्व 650 रोपांना ड्रीप ने पाणी दिले जात. तसेच रोपांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा नाही तर सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व रोपांची लागवड ही इस्रायल पद्धतीने केली होती. झाडांची लागवड करताना त्यामधील अंतर हे 5 फूट एवढे ठेवले होते. अश्या प्रकारे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून 1 एकर क्षेत्रावर4 लाखांचे उत्पन्न गजानन कराळे यांनी मिळवलं.
गजानन कराळे यांनी मिळवलेल्या उत्पन्नमुळे जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे शिवाय येणाऱ्या काही दिवसात बाकीचे शेतकरी सुद्धा त्यांचे अनुकरण करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून बक्कळ नफा कमवू शकतात त्यामुळे येणाऱ्या काळात केसर आंब्याचे उत्पन्न वाढले शिवाय लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज गजानन कराळे यांनी केला आहे.
Share your comments