शेतकऱ्यांना शेती करत असताना कधी चांगले दिवस येतील आणि कधी वाईट दिवस येतील हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागते. अनेक शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करतान दिसतात. आता अशाच एका शेतकऱ्याने पारंपारीक शेतीला फाटा देत संत्र्यांची बाग फुलवली आहे. त्यांच्या या बागेमुळे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्याला चांगली किंमत दिली आहे. यामुळे सध्या हा शेतकरी मालामाल झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या चर्चा रंगली आहे. नगर तालुक्यातील वाळकी गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचे नाव भाऊसाहेब नानासाहेब बोठे असे आहे. त्यांनी हा वेगळा प्रयोग केला आहे.
त्यांनी पारंपारीक शेती करुन काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी फळबाग करण्याचे ठरवले. जमिनीची मशागत करुन त्यांनी तीन वर्षांपूर्वी संत्रीची ५ हजार ५०० झाडे लावली. या फळबागेने पहिल्यांदाच बहार धरला आहे. आता व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे धाव घेतली आहे. तसेच तब्बल ८१ लाखांना ही बाग खरेदी केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भाऊसाहेब बोठे संपुर्ण राज्यात चर्चेत आले आहे. वेळेत पारंपारीक शेती सोडून शेतात नवीन प्रयोग केल्यामुळे त्यांना याचा फायदा झाला आहे.
नगर तालुक्यात पाण्याचा या प्रश्नावर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करुन त्यावर मार्ग काढला आहे. शेतकरी भाऊसाहेब बोठे यांनी २०१९ मध्ये संत्र्याच्या ५ हजार ५०० झाडांची लागवड केली होती. त्यांनी झाडांची योग्य काळजी घेतली आणि सेंद्रीय शेतीवर भर दिला. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी २ कोटी लीटरचे त्यांनी शेततळे बांधले. त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता भासत नव्हती. त्यांनी झाडांसाठी ठिंबक सिंचन केले आहे. त्याची सेंद्रीय खते त्यांनी वापरली आहे. याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.
या बागेसाठी त्यांना ५० लाखांचा खर्च आला होता. आता पहिलाच बहार आल्यानंतर निम्म्या झाडांना फळे आली आहे. काही झाडांना कमी प्रमाणात फळे आली आहे. झाडांची चांगली मशागत केल्याने फळांचा आकार आणि त्यांना गोडी उत्तम होती. त्यामुळे त्यांची ही बाग व्यापाऱ्याने ८१ लाखांनी खरेदी केली आहे. यामुळे त्यांना यामधून चांगले पैसे मिळाले आहेत. यामुळे त्यांची शेती बघण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत.
Share your comments