आज कालचा तरुण म्हटला म्हणजे चांगले शिक्षण घेऊन पाच आकडी पगाराची नोकरी मिळाली म्हणजे पुरेएवढ्यावरच समाधान मानणारा आहे.
शेतीकडे बरेच तरुणांचे दुर्लक्ष होत असून शेती हा एक तोट्याचा व्यवसाय म्हणून तरुण शेतीकडे पाहतात. खरं पाहायला गेलं तर शेतीची परिस्थिती पाहिली म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्याने कायमच अनिश्चिततेच्या भोवर्यात सापडलेले असते. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टींमुळे शेतीमध्ये नुकसान जास्त होत असते. त्यामुळे खरंतर पाहायला गेले तर आजकालच्या तरुणाईची शेतीबद्दल ही मनस्थिती आहे. परंतु असे बरेच तरुण आहेत कि जे शेतीसंबंधी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पारंपरिक शेतीला फाटा देत उच्चशिक्षण असूनदेखील शेती व्यवसायात उतरत आहेत. एवढेच नाही तर शेती यशस्वी देखील करून दाखवत आहेत. या लेखामध्ये आपण अशाच एकाउच्चशिक्षित तरुणाच्या यशा बद्दल माहिती घेणार आहोत.
एमबीए चे शिक्षण तरीही शेतीत रस
यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील शुभम राजेंद्र नाईक हा तरुण नेर येथे राहतो. त्याचे वडील वरिष्ठ शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असूनवडील जरी शिक्षक असले तरी ते उरलेला वेळ शेतीतच देत होते. तसं पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या उच्च शिक्षणातून आधुनिक पीक पद्धतीचा मार्ग अंगीकारून या मार्गाच्या माध्यमातून वैफल्यग्रस्त शेतकरी बांधवांना आशेचा किरण दाखवावा ही ओळख काहीशी पुसता यावी ही भावना मनाशी बाळगून शुभमने बारावीनंतर कृषी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले.
त्यानंतर शुभमने यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयातील बीएससी एग्रीकल्चर या पदवीचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर मधून कृषी क्षेत्रातच एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केले. आता एमबीए केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी शुभमला मिळणे शक्य होते. परंतु शुभमने तसे न करता त्यांच्या गावी कोव्हळा येथे त्यांच्या घरची सात एकर शेतीपैकी एका एकरात अश्वगंधाची शेतीचा प्रयोग यशस्वी केला. याचे बियाणे त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कृषी केंद्र चालक मित्राकडून मागवले व त्याला एका एकरात जवळपास चार ते पाच किलो बियाणे लागले. बियाणे, अश्वगंधा ची लागवड तसेच त्यावरील इतर खर्च धरूनएकरी पंधरा हजार रुपयांपर्यंत लागवड खर्च आला.आता शुभमला या एक एकर शेतीच्या माध्यमातून सात ते आठ पट अधिक उत्पन्न अपेक्षित आहे.एका एकरामध्ये तीन ते चार क्विंटल अश्वगंधा च्या मुलांचे उत्पादन निघते.
अश्वगंधा चे औषधी गुणधर्म
अगदी पुराण काळातही अश्वगंधा चा उल्लेख करण्यात आलेला आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये ही अतिशय महत्त्वाची वनस्पती असून शक्तिवर्धक व पचनशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणूनही अश्वगंधा चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मध्यप्रदेश राज्यातील निमजगाव मंडी येथे या वनस्पतीचे मोठी बाजारपेठ आहे.
Share your comments