
IAS Himanshu
असे म्हणतात की जोश, धैर्य, आणि उत्कटता ही अशी शक्ती आहे जी वाईट परिस्थिती देखील बदलू शकते. या गोष्टी खऱ्या असल्याचे आयएएस अधिकारी हिमांशू गुप्ता यांनी सिद्ध केले आहे. होय, आयएएस अधिकारी हिमांशू गुप्ता यांची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे, या आयएएस अधिकाऱ्याची कहाणी वाचून तुम्ही देखील तुमचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करणार एवढे नक्की.
चला तर मग जाणून घेऊया हिमांशू गुप्ता यांची चहा विकण्यापासून ते IAS अधिकारी होण्यापर्यंतची प्रेरणादायी कहाणी.
हिमांशू गुप्ताच्या संघर्षाची कहाणी
हिमांशू गुप्ता यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला. त्यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे आणि एक काळ असा होता जेव्हा हिमांशू यांनी स्वतः देखील हातगाडीवर चहा विकला आहे. घर चालवण्यासाठी उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने हिमांशूलाही वडिलांची मदत करावी लागायची.
हिमांशू गुप्ताही अनेकदा चहाच्या स्टॉलवर चहा विकायचा. तो सांगतो की, एक काळ असा होता जेव्हा ते आणि त्यांचे वडील दोन्ही मिळून घर चालवण्यासाठी दिवसाला फक्त 400 रुपये कमवायचे.
70 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जायचे
हिमांशू यांनी स्वतः मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर ते त्यांच्या वडिलांसोबत काम करायचे. शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ते त्यांच्या मित्रांसोबत व्हॅनमधून शाळेत जायचे.
अशा परिस्थितीत वर्गमित्र त्यांच्या चहाच्या टपरीजवळ यायचे, जेव्हाही ते त्यांना त्याच्या हातगाडीजवळ दिसायचे तेव्हा ते लपून बसायचे. पण असे असूनही एका मित्राने त्यांना एकदा चहा विकताना पाहून त्यांची चेष्टा केली. यानंतर अनेकवेळा त्यांना 'चायवाला' देखील म्हटले गेले.
ते पुढे सांगतात की, त्यांची स्वप्ने मोठी होती, त्यामुळे कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले आणि जेव्हाही त्यांना अभ्यासातून वेळ मिळाला तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना चहा विकण्यात मदत केली. या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके निरक्षर लोक असताना त्यांनी मन लावून अभ्यास करून आपले नशीब बदलावायचे ठरवले.
त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे की आज त्यांनी UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आज ते एक यशस्वी IAS अधिकारी बनले आहेत.
Business Idea 2022: अमूल कंपनीसोबत काम सुरु करा अन कमवा महिन्याकाठी लाखों, वाचा सविस्तर
क्लास न लावता बनले आयएएस अधिकारी
एका साध्या कुटुंबातील हिमांशू गुप्ता यांनी घरी राहून कठोर परिश्रम घेऊन सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केल्याचेही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आले आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताना हिमांशू गुप्ता यांनी कोणत्याही कोचिंगचा सहारा घेतला नाही किंवा ते कोणत्याही मोठ्या शहराकडे वळले नाहीत.
Share your comments