1. यशोगाथा

जिद्दाच्या जोरावर झाला ८० एकरच्या बागाचा मालक

पुणे : आमचे सुद्धा दिवस येणार. आमचे सुद्धा आईवडील अभिमानाने सांगतील की आमचा मुलगा प्रगतिशील, आधुनिक शेतकरी आहे. शेतकरी असणे हा शाप आहे. त्यात एखाद्या तरुण मुलाने जर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला तर पहिला घरातून आणि नंतर नातेवाईक विरोध होतो. त्यामुळे

KJ Staff
KJ Staff


पुणे : आमचे सुद्धा दिवस येणार, आमचे सुद्धा आईवडील अभिमानाने सांगतील की आमचा मुलगा प्रगतिशील, आधुनिक शेतकरी आहे. शेतकरी असणे हा शाप आहे. त्यात एखाद्या तरुण मुलाने जर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला तर पहिला घरातून आणि नंतर नातेवाईक विरोध होतो. त्यामुळे तरुण मुले हा मार्ग नको म्हणतात. मात्र मागच्या काही वर्षांपासून हे चित्र  बदलायला सुरुवात झाली आहे. या उद्योगात जर कष्ट हुशारीचा वापर केल्यास बक्कळ पैसा मिळू शकतो हे मागच्या काही वर्षात सिद्ध झाले आहे.

 पुणे जिल्ह्यातील रोहित चव्हाण या तरुण शेतकऱ्याने असच काहीतरी करून दाखवलं आहे. रोहितने आपल्या जिद्दीने आणि कर्तुत्वाने शेती व्यवसायात यश मिळवलं आहे.  काही नसललेल्या रोहितकडे जिद्द होती काहीतरी करु दाखवयाची, त्याच्या जोरावर रोहित आज ८० एकराचा बागयतदार आहे.रोहित हा अतिशय सामान्य घरातून येतो.  त्याचा लहानपणीचा काळ हा हलाखीत गेला. त्याला त्याचे लहानपण आठवते.  लहानपणी शाळेची फी भरायला पैसे नसायचे. त्यामुळे आम्हाला जे आहे त्यातच दिवस काढायची सवय लागली. रोहितने कसेबसे शिक्षण पूर्ण केले.  रोहितला पैसे कमवायचे होते.  त्याने शेतीचा अभ्यास केला आणि एकंदरीत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन द्राक्षे लावण्याचा निर्णय घेतला.  त्याने शेतीतील आधुनिक तंत्राचा अभ्यास केला. मधल्या काळात त्याने आयात निर्यतीचा अभ्यास केला.

अनेक शेतकऱ्यांना जास्त माहिती नसल्याने आपला माल थेट व्यापाऱ्यांना विकतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे फळ कमी मिळते.  रोहितने या सगळ्यावर मात करत करत द्राक्षे निर्यात केली.  त्याने निर्यातक्षम द्राक्षांचा उत्पादनासाठी सगळ्या आंतरराष्ट्रीय मानांकनाचा पालन केले आहे. त्यामुळे निर्यातील कोणत्याही अडचणी आल्या नाहीत.  रोहितने आपल्या बॅगेतील द्राक्षे अमेरिकन  आणि युरोपियन बाजारात विकून चांगले पैसे मिळवले आहेत. आजमितीला त्याच्याकडे ८० एकर बाग आहे. त्याने त्याच्या पूर्वजांच्या १५ एकर जमीनीवरून सुरुवात केली होतो. त्याच्याकडे १  लाख द्राक्षाचे वेल आहेत. तसेच तो आता आजूबाजूच्या  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो.

English Summary: on the Stubbornness power he became the owner of 80 acres of orchards Published on: 30 July 2020, 07:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters