शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे तसेच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत.
जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती मध्ये तसेच शेती संबंधित कामांमध्येसुलभता निर्माण होऊन आर्थिक संपन्नता येऊ शकते. त्यातीलच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर पंप योजना ही होय. या योजनेचा लाभ घेऊन एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सौरसंच बसवला व त्यांची 12 एकर ऊस शेती बहरून आली. या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा बद्दल या लेखात माहिती घेऊ.
तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ या खेडेगावातील एक पदवीधारक तरुण शेतकरी शुभम उपासनीयांनी मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये वडिलांच्या नावावर अर्ज केला.
त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून त्यांची निवड होऊन साडेसात अश्वशक्तीच्या कृषी सोलर वॉटर पंप शेतात बसविण्यात आला. या सोलर वॉटर पंपामुळे उसाला पाणी देताना विजेच्या लपंडाव मुळे जो त्रास होत होता व त्यासोबतच पिकांचे नुकसान होते ते टळूनआता त्यांच्या शेतामध्ये 12 एकर ऊस असून एवढ्या मोठ्या क्षेत्रातील ऊसाला सोलर वॉटर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे व सुलभ झाले.जर सोलर वॉटर पंपाचा खुल्या बाजारातील किमतीचा विचार केला तर ती साडेचार ते किमतीचा विचार केला तर परंतु या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान सोलर पंपासाठी दिले जाते. शुभम याने यासाठी दहा टक्के स्वतःच्या हिश्याची रक्कम भरली व त्या माध्यमातून त्यांना सोलर संचमिळाला.
या संचाला साडेसात अश्वशक्तीचा पंप जोडण्यात आला.त्याचा फायदा असा झाला की आता सद्यस्थितीत सकाळी साडे आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुठलाही अडथळा न येता पंप सुरू राहतो व शेताला पाणी देता येते. शुभम शेतीस नाही तर शेतीला जोड धंदा म्हणून गाय पालन देखील करतो.. सध्या शुभम कडे जर्सी व गीर जातीच्या गाई असून या माध्यमातून तो दूध उत्पादनचनाही तर शेणखत देखीलउपलब्ध झाल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करणे शक्य झाले आहे.(स्त्रोत-इंडियादर्पण)
Share your comments