लखनौ- छंद माणसांचे आयुष्य घडवतात. माणसाच्या जीवनाला नवा आयाम देतात. अशाच प्रकारच्या झाडांसोबत रममाण होण्याच्या छंदामुळे लखनौचे कालीमुल्लाह खान भारताचे ‘मँगो मॅन’ म्हणून ख्यातकीर्त झाले आहेत. एकाच आंब्याच्या झाडावर ३०० हून अधिक भिन्न आंब्याच्या प्रजातींचे रोपण करण्याची यशस्वी किमया साधली आहे. एकाच झाडावर भिन्न रंगाचे विविध आकाराचे लगडलेले आंबे जागतिक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ स्थित कालीमुल्लाह यांची आमराई विस्तारलेली आहे. या आमराईत विविध रंगाच्या आंब्याने लगडलेल्या फांद्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कृषी पर्यटनाला नवीन आयाम देणारी कालीमुल्लाह यांची आमराई जागतिक पर्यटनाचे नव केंद्र बनली आहे.
आमराईतील प्रत्येक फांदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक फांद्यावरील आंबे वैशिष्ट्यपूर्ण आहे. चौकोनी, विभिन्न आकारासह भिन्न रंगाच्या आंब्यांनी फांद्या लगडल्या आहेत. पिवळ्या ते तपकिरी, गुलाबी रंगाचे आंबे आहेत. मलिहाबाद ही आंब्याची राजधानी मानली जाते. उत्तर भारत हे आंब्याचे आगार मानले जाते. दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. जागतिक उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन या क्षेत्रातून होते.
कालीमुल्लाह खान हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत. लौकिक स्वरुपात खान यांचे शिक्षण झालेले नाही. मात्र, गुलाबाच्या झाडाला विविध रंगांची फुले येतात. कलम पद्धतीने हे शक्य असल्यामुळे आंब्याची कलम करण्याचा प्रयोग खान यांनी केला. एकाच झाडाला विविध रंगाचे लगडलेले आंबे पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
वयाच्या १७ व्या वर्षी एका झाडावर सात विभिन्न प्रजातींचे रोपण करण्याची किमया त्यांनी साधली. फांद्यांची कापणी करण्याची कला त्यांना अवगत आहे. विशिष्ट कोनात फांदी कापावी लागते. ३० वर्ष जुन्या आंब्याच्या झाडावर त्यांनी तब्बल ३०० प्रजातींचे रोपण केले.
खान यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नागरी पुरस्कार सन्मान पद्मश्री देखील समाविष्ट आहेत. विविध विद्यापीठात खान यांच्या संशोधनाचे अध्ययन केले जाते. नैसर्गिक संपदेचे संवर्धन करण्याचा वसा बाळगलेल्या खान यांनी आपल्या प्रजातींना नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या रॉय-बच्चन यांची नावे दिली आहेत. आजवर केलेल्या कामाचे सादरीकरण सातासमुद्रापार देखील केले आहे. राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनमध्ये त्यांच्या आंब्याच्या झाडाचे रोपण करण्यात आले आहे.
PM
Click here to

Share your comments