भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार कृषी क्षेत्रामुळे लागत आहे त्यामुळे देशातील 90 टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. सध्या राज्यात शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने शेतकरी शेती करत आहे. हे सर्व तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री यामुळे शक्य झाले आहे.
आपल्या देशात प्रामुख्याने हंगामानुसार पिके घेतली जातात. रब्बी आणि खरीप हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. सध्या शेतकरी वर्गाचा फळशेती आणि फुलशेती कडे जास्त कल वाढला आहे. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी वर्गाने फळ आणि फुल शेती कडे कल वाढला आहे.
बरेच शेतकरी झेंडू ची लागवड आंतरपीक म्हणून करतात आणि बक्कळ नफा मिळवत आहेत. बीड जिल्ह्यातील निमगाव या छोट्याश्या खेडेगावात राहणाऱ्या शिवाजी धोंडीबा देवकर या शेतकरी वर्गाने कपाशी च्या रानात झेंडूची लागवड केली होती. घरात 6 व्यक्ती असल्यामुळे फुलशेती ला चांगले पाठबळ मिळाले होते. वर्षभर झेंडूची फुलं विक्री करून ताजे उत्पन्न मिळत असल्यामुळे यांनी फुलशेती वरच आपले लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा:-राज्यात गाय आणि म्हशीच्या आढळल्या नवीन जाती, वाचा सविस्तर
शिवाजी धोंडीबा देवकर यांची गावी 20 एकर शेती आहे ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात. ते शेतीमध्ये झेंडू, टरबूज, खरबूज इत्यादी फळांची लागवड करत आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर पिकाच्या तुलनेत ही आधुनिक कमी वेळात येणारी पिके जास्त परवडतात. त्यामुळे त्यांनी याच पिकांवर जास्त भर दिला जात आहे. शिवाजी देवकर यांनी सांगितल्या प्रमाणे जून, जुलै, ऑक्टोबर व पुढे टप्प्याटप्प्याने झेंडू लागवडीचे नियोजन करावे. त्यामुळे उत्पन्नाचे चक्रही वर्षभर सुरू राहते. एकरी सुमारे सहा ते सात टन उत्पादन मिळते. तसेच या फुलांना बाजारात प्रचंड मागणी सुद्धा आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळे फुलांना बाजारात प्रचंड मागणी आहे शिवाय फुलांना चांगला भाव सुद्धा मिळत आहे.
हेही वाचा:-सावधान, थंडीच्या दिवसात हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर नक्की वाचा
त्यामुळे सतत फुलांची विक्री करून ते हजारो लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज ताजे उत्पन्न मिळत असल्यामुळे वर्षाकाठी ते 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न अगदी सहजपणे मिळवतात. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत कमी कष्ट आणि कमी मजूर आणि जास्त उत्पन्न यामुळे शिवाजी देवकर यांनी फुलशेती कडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
Share your comments