सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे आता पुढील काही दिवस आपल्या घरात चहापेक्षा जास्त लिंबू सरबताचे दिवस सुरु होणार आहेत. तसेच इतर अनेक ठिकाणी याची मागणी ही जास्तच असते. असे असताना आता एक शेतकरी यातून लखपती झाला आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत लिंबूची 150 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे.
कांडली इथले शेतकरी श्रीकांत पतंगे यांनी लिंबाच्या बागेची लागवड केली असून ते लखपती झाले आहेत. त्यांना अडीच एकर लिंबोणीच्या बागेतून १३ लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यांनी अडीच एकर शेतीमध्ये 600 लिंबाच्या झाडांची लागवड पतंगे यांनी केली आहे. या बागेला आतापर्यंत जोपासताना श्रीकांत पतंगे यांना तीन लाख रुपये खर्च आला आहे.
त्यांनी पाणी आणि योग्य खत पुरवत तीन वर्षात ही बाग मोठी केली आहे. गेल्या वर्षी बाजार भाव नसल्याने किरकोळ दराने लिंबाची विक्री करावी लागली होती. गेल्या वर्षी 50 हजारांचे उत्पन्न या लिंबाच्या बागेतून मिळाले होते. आता मात्र दर वाढले आहेत. यामुळे त्यांना चांगले पैसे मिळतील असा विश्वास आहे. यावर्षी संपूर्ण बाग लिंबांनी बहरुन गेली आहे.
या लिंबाच्या बागेतून अंदाजित 90 क्विंटल उत्पादन निघेल. त्यामुळे त्यांना 13 लाख रुपये इतका मोबदला मिळेल. सध्या उन्हाळा म्हटले की लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु दरवर्षी लिंबाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. परंतु यावर्षी लिंबाला सर्वोच्च भाव मिळाला आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना मिळणार अनुदान स्वरूपात डिझेल? मशागत महागल्याने चर्चा सुरु..
तब्बल ४००० कोटींची गुंतवणूक, शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा...
फिर हेरा फेरी नाही, ही तर आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, पैसे होत आहेत दुप्पट
Share your comments