सध्या सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानात लिंबाची मागणीदेखील लक्षणीय वाढली आहे. यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना (Lemon Growers) त्याचा मोठा फायदा होत आहे. खर पाहता उन्हाळ्यात लिंबाची मागणीत वाढ ही ठरलेलीच असते. मागणीत वाढ होत असल्याने लिंबाच्या दरात (Lemon Rate) देखील मोठी वाढ होते. असं असलं तरी यंदा मात्र लिंबाच्या दरात नेहमीपेक्षा अधिक वाढ बघायला मिळत आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, यावर्षी नेहमीपेक्षा तापमानात अधिक वाढ तसेच लिंबाच्या उत्पादनात झालेली घट या दोन प्रमुख कारणांमुळे लिंबाच्या दरात कधी नव्हे ती लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसत असून शेतकऱ्यांना मात्र ही दरवाढ फायद्याची ठरत आहे.
मध्यप्रदेश मध्ये देखील शेतकरी बांधवांसाठी लिंबाची शेती (Lemon Farming) मोठी फायद्याची ठरत आहे. राज्यातील सागर जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात देखील लिंबाची शेती शेतकऱ्यांना विशेष मालामाल करीत आहे. येथील शेतकऱ्यांनी मनरेगा योजना अंतर्गत अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत लिंबाच्या बागाची लागवड केली होती. यावर्षी लिंबाला अधिक बाजार भाव मिळत असल्याने या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा देखील झाला. विशेष म्हणजे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना पोषक वातावरण मिळाल्याने चांगले उत्पादन देखील मिळाले आहे.
हेही वाचा:-मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही
मित्रांनो यावर्षी संपूर्ण देशात लिंबाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात देखील यांच्या उत्पादनात घट झाली असल्याने लिंबाचा तुटवडा बघायला मिळाला. मध्य प्रदेशमध्ये देखील यंदा लिंबाच्या उत्पादनात घट झाली असल्याने आवक मोठी कमी झाली आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात लिंबाच्या भावात वाढ झाली आहे.
लिंबाला 100 ते 200 रुपये शेकडा असा भाव मिळत आहे. सागर जिल्ह्यातील देवरी जनपद पंचायतीच्या डोभी सिमरिया या ग्रामपंचायतीत मनरेगा योजनेत सहभागी होऊन प्रशांत या गरीब शेतकऱ्याने सुमारे 200 ते 300 लिंबाची झाडे लावली आहेत. शेतकरी प्रशांत यांनी सांगितले की, गतवर्षी मनरेगा योजनेंतर्गत जनपद पंचायत देवरी येथे 2 एकर त्यांनी लिंबाची लागवड केली. लिंबाची कलमे आणून त्यांनी ही लागवड केली होती.
हेही वाचा:- Beekeeping : मधमाशी पालन करून अवघ्या काही महिन्यातच बना श्रीमंत; सरकार देणार 90 टक्के अनुदान
प्रशांत यांनी लिंबाची लागवड केल्यानंतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून तसेच खतांचे सुयोग्य नियोजन करून लिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यांच्या शेतात लिंबाची 200 ते 300 हिरवी झाडे आहेत. प्रत्येक झाडावर सुमारे 70-90 लिंबू लगडलेले आहेत. प्रशांत पूर्वी मजुरीचे काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होते.
आज मात्र ते शेती करून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत. सध्या एक लिंबू 10 ते 20 रुपयांना विकला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे प्रशांतला देखील वाढत्या दराचा फायदा मिळाला आहे. त्याच्या या यशाचे श्रेय त्याने देवरीचे सीईओ देवेंद्र जैन आणि सहाय्यक सचिव चंद्रभान कुर्मी यांना दिले आहे. एकंदरीत शासनाच्या योजनेचा प्रशांत यांना मोठा फायदा झाला असून त्यांचे नशीब बदलले आहे.
हेही वाचा:-मेहनत केली पण वाया नाही गेली!! पुरंदरचे अंजीर युरोपात दाखल
Share your comments