आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर डिपेंडंट आहे. देशातील अनेक शेतकरी शेतीच्या क्षेत्रात अनन्यसाधारण असे यश संपादन करतात, आणि यातून आपले नाव मोठे करतात, प्रसिद्धी बरोबरच अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई देखील करतात. असे शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याच्या यशाविषयीं जाणून घेणार आहोत, ही महिला शेतकरी देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरली आहे. आज आपण महिला शेतकरी कृष्ण यादव यांच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत. महिला शेतकरी कृष्णा यादव यांनी केवळ पाचशे रुपयात स्वतःचा व्यवसाय उभा केला, आणि आज हा व्यवसाय कोट्यावधी रुपयांचा बनला आहे. त्यांनी चक्क चार कंपन्या स्थापन केल्या आहेत.
महिला शेतकरी कृष्ण यादव यांचा जीवन प्रवास
कृष्णा यादव हे मूळचे बुलंदशहर येथील रहिवासी आहेत. जेव्हा त्यांच्या पतींना बिजनेस मध्ये मोठे नुकसान झाले तेव्हा त्यांनी युपी मधील बुलंदशहर सोडले आणि ते हरियाणामधील गुरुग्राम येथे स्थायिक झाले. 1996 मध्ये कृष्णा यादव यांनी बुलंद शहर सोडले. गुरुग्राम मध्ये आल्यानंतर कृष्ण यादव यांनी थोडीशी जमीन विकत घेतली. 2001 मध्ये कृष्णा यादव यांनी एका मित्राच्या सांगण्यावरून उजवा इथल्या कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी जाऊन खाद्य प्रक्रिया टेक्निकचे तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी आपल्या शेतात पिकणाऱ्या भाजीपाला पिकांचे लोणचे तयार केले.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सुरुवातीला त्यांनी फक्त पाचशे रुपयात या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कृष्णा यांनी आपल्या पतीला रस्त्याच्या किनार्यावर लोणचे विकण्यासाठी उभे केले होते. त्यामुळे लोक त्यांना चिडवत पण जसजसा व्यवसाय वाढायला लागला तसतसे चिडवणारे लोकच त्यांची प्रशंसा करू लागले. त्यानंतर त्यांनी तीन हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 100 किलो लोणचे तयार केले. यात त्यांना बावीसशे पन्नास रुपये निव्वळ नफा मिळाला. कृष्णा यांची हीच खरी पहिली कमाई होती.
आज्जीने दिला मोलाचा सल्ला
कृष्णा यांना त्यांच्या आजीने भाजीपाला उगवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला उगवायला सुरुवात केली व त्यापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यांनी प्रक्रियायुक्त पदार्थ बनवताना कुठल्याही केमिकल्सचा उपयोग केला नाही, त्यांनी पदार्थ बनवताना चांगल्या तेलाचा उपयोग केला. म्हणून त्यांच्या प्रोडक्सला चांगली मागणी देखील मिळत होती. सर्व्यात आधी त्यांनी आपल्या शेतात उगवलेल्या गाजर आवळा कोबी असे इत्यादी भाजीपाला पिकांची लोणचे बनवले. जेव्हा बिजनेस वाढायला लागला तेव्हा त्यांनी इतर शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचे बियाणे पुरवून वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची शेती करायला सांगितलं आणि ते त्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करू लागले. त्यांनी वेगवेगळे लोणचे बनवले नंतर त्यांना होलसेल मध्ये ऑर्डर मिळू लागल्यात. आज कृष्णा चार कंपन्यांचे मालक आहेत, व त्यांचा करोडोचा बिजनेस आहे, ते त्यांच्या कंपनीत 150 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतात, व यातून चिक्कार कमाई करतात.
Share your comments