1. यशोगाथा

Digital Farmer: 'येथील' शेतकऱ्यांनी स्वतःची वेबसाईट केली तयार अन स्वतः पिकवलेल्या आंब्याची केली विक्रमी विक्री

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
karnatka farmer making self website for mango cultivation and earn more profit

karnatka farmer making self website for mango cultivation and earn more profit

 कृषी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत मेहनत आणि झोकून देऊन काम केले तर शेती हा सुद्धा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो.कर्नाटकातील शेतकऱ्यांनी हे सत्य दाखवून दिले आहे. ते

. ते आता एकत्र ग्रुप मध्ये सामील झाले आणि आता ते आपले उत्पादन बाजारापेक्षा जास्त किमतीत विकून नफा कमवत आहेत.त्याच्या मॉडेलची इतर राज्यातही चर्चा होत असून शेतकरी ते अंगीकारण्यासाठी अभ्यासकरत आहेत.

कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकरी एकत्र येऊन उद्योजक बनले आहेत. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचे ई-मार्केट तयार केले आणि आज त्याचा फायदा त्यांना मिळत आहे. कर्नाटकात राहणाऱ्या चार शेतकऱ्यांनी स्वतःची वेबसाईट तयार केली आहे.

याद्वारे ते त्यांच्या शेतीमालाची विक्री करतात. सीजी नागराजू, संचालक कर्नाटक राज्य आंबा विकास आणि विपणन निगम लिमिटेड यांनी डेक्कन हेराल्ड शी बोलताना या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेसे ग्राहक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे बेस तयार आहे, ज्यांचा त्यांना फायदा होत आहे.

नक्की वाचा:रिफ्रॅक्टेबल रूफ पॉलिहाऊस: या तंत्रामध्ये शेतकऱ्यांना हंगामी आणि बिगरहंगामी असे वर्षभर पिकांचे उत्पादन घेणे शक्य, वाचा सविस्तर माहिती

पोर्टलवरून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ:

KSMDMCL ने 2018 मध्ये आंब्याच्या विक्रीस स्वतःचे पोर्टल तयार केले होते. तेव्हापासून या पोर्टलला चांगला प्रतिसाद मिळत असून आंबा खरेदीसाठी ग्राहक या पोर्टलला पसंती देत आहेत. या वेबसाईटचे यश पाहून शेतकऱ्यांना स्वतःची वेबसाईट सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

पोर्टलद्वारे उत्पादनाच्या विक्रीतील मध्यस्थांची भुमिका संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत आहे.

 व्यंकटेशप्पा या शेतकऱ्यांनी आपल्या वेबसाईट द्वारे आंब्याची विक्री केल्याचे सांगितले की, मध्यस्थ शेतकऱ्यांना त्रास देतात. फेकलेल्या किमतीत उत्पादने विकण्यास भाग पाडले.

त्यामुळे शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवरून उत्पादने विकल्यास, मध्यस्थावरचे अवलंबित्व नाहीसे होते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्ही आमच्या वेबसाईटवर 15 टन आंब्याची विक्री केली असून, त्याला बाजारापेक्षा जास्त भाव मिळाला आहे. मात्र यावेळी खराब हवामानामुळे ते ऑर्डर घेत नाहीत.

नक्की वाचा:जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन

मोठ्या प्रमाणात शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत आहेत :

 व्यंकटेशप्पा यांच्या प्रमाणेच इतर शेतकरीही स्वतःची वेबसाईट तयार करून आंब्याची विक्री करत आहेत. अरुणा अंजनप्पा या शेतकऱ्याने सांगितले की, पोर्टलला विक्रीकराने अधिक नफा मिळत आहे. आम्हाला दररोज 20 पेटी  आंब्यांची ऑर्डर मिळत आहे.

याचा फायदाही लोकांना होत आहे. त्यांना ताजा व दर्जेदार आंबा मिळत आहे. राज्यातील सर्व शेतकरी असे प्रयत्न करत असून सर्वांना यश मिळत असल्याचे केएसएमडीएमसीएलचे म्हणणे आहे.

नक्की वाचा:Mango Cultivation Tricks: आंबा लागवडीतून जास्त उत्पादन हवे असेल तर या पद्धतीने करा लागवड, होईल फायदा

English Summary: karnatka farmer making self website for mango cultivation and earn more profit Published on: 12 June 2022, 05:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters