1. यशोगाथा

कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..

जळगावमध्ये (Jalgaon) 'सावदा' इथं पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेत 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देण्यात आला.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Kapil Jachak awarded Keliratna Award

Kapil Jachak awarded Keliratna Award

जळगावमध्ये (Jalgaon) 'सावदा' इथं पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेत 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देण्यात आला.

ज्या शेतकऱ्यांनी एकरी केळीचे 30 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतलं आहे, त्या शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. यामध्ये केळीला केळीला प्रतिकिलो 18 रुपये 90 पैसे हमीभाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसह केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केली.

शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीट, बोगस खते, निकृष्ट प्रतिची रोपे, बोगस खते याचबरोबर विमा कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक याचा सामना केळी उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या सर्व मुद्यांवर या परिषदेत चर्चा झाली.

केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली.

7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरला..

इंदापूर तालुक्यातील शेतकरी कपिल जाचक केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. केळी उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवून मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवले आहे. तसेच एकरी केळीचे 30 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहेत. यामुळे त्यांची निवड याठिकाणी करण्यात आली.

तसेच गणेश कदम (पंढरपूर), किशोर राणे (यावल जळगाव), यश नराजे (तेल्हारा अकोला), विजय कोकरे (करमाळा), सुमण रणदिवे (पंढरपूर), धिरज पाटील (सोयगाव, संभाजीनगर), अभिजीत पाटील (करमाळा), शिवशंकर कोरडे (तेल्हारा अकोला), नागेश चोपडे (अंदापूर), लक्ष्मण सावळे (रावेर), दत्तात्रय सजे (अहमदनगर) यांना पुरस्कार देण्यात आला.

देशात दिवसभरात 10,112 कोरोना रुग्ण, 29 मृत्यू; गेल्या महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ..

तसेच कन्हैय्या महाजन (रावेर), अतुल जावळे (यावल जळगाव), विजय पाटील (जळगाव), उत्तम पाटील (जळगाव)भालचंद्र पाटील (जळगाव), दिनेश आढाव (संग्रामपूर बुलढाणा), माणिक पाटील (जळगाव) या 19 शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आहे.

केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यात यावा. केळीला 18 रुपये 90 पैसे असा हमीभाव मिळावा. विमा कंपन्यांची मनमानी थांबूवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. प्रतिबंधित असणारी औषधे, तसेच खते यापुढे कुठल्याही कृषी केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवल्यास कृषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे ठराव करण्यात आले आहेत.

मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी, सरकारकडून 85 टक्के अनुदान..
या महिन्यात करा खरबुजाची लागवड, 80 ते 100 दिवसात कमवा चांगला नफा..
Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

English Summary: Kapil Jachak awarded Keliratna Award, Honored by Council for getting more production.. Published on: 25 April 2023, 10:59 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters