Jalgaon: शेती परवडत नाही असे सहज म्हटले जाते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील (Rajendra Hari Patil) यांनी हे वाक्य खोट ठरवलं आहे. केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत.
राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने शेती मध्ये कमालच केली आहे. पाटील यांनी स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
राजेंद्र पाटील यांची स्वतःची दीड एकर शेती आहे. राजेंद्र पाटील हे शेतात काम करत असल्याने त्यांना शेतीचे चांगले ज्ञान मिळाले. शेतमजूर म्हणून त्यांनी पदवी (degree) संपादन केली. राजेंद्र पाटील हे नोकरीत गुंतले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांच्यात झालेल्या वादामुळे ते नोकरी सोडून पुन्हा शेतीकडे वळले.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये काय फरक आहे? बाईक डिझेलवर का चालत नाही? जाणून घ्या उत्तर
पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडेतत्वावर घेऊन शेती सुरू केली कारण त्यांच्याकडे जमीन कमी असल्याने त्यातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यात त्यांना चांगले यश मिळाल्याने आज पाटील यांच्याकडे ६५ एकर जमीन भाडेतत्त्वावर आहे. त्यांच्यासाठी दीडशे लोक काम करतात.
राजेंद्र पाटील यांनी सत्कार समारंभासह शेतात काम करणाऱ्या मजुरांना व सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कपडे, अन्नधान्य, मिठाई वाटप करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
मोठी बातमी! दूध दरात होणार वाढ; दूध संघांची पुण्यात बैठक
आमच्या शेतात अहोरात्र काम करणारे मजूर, सालदार यांचे आम्हाला शेतीतून एक कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज आपल्याला शेतीत एवढे उत्पन्न मिळू शकले. त्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त केलेच पाहिजे, अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मुसळधार पाऊसानंतर राज्यात किती असणार थंडी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Share your comments