सध्या च्या युगात शेतीला आधुनिकतेची जोड ही खूप आवश्यक आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे आपण शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. शेती करायची म्हटलं की कष्ट हे करावेच लागते. शेतीला कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. कष्ट करून आपण अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो.भुदरगड येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतीमध्ये असा बदल केला आहे की ते बघितल्यावर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही.कष्ट, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती अंगी असल्यास कोणतेच काम अशक्य नाही असे या तरुणाने अन्य शेतक्याना दाखवून दिले आहे.
ठिबक सिंचन ठरले उपयोगी :
बऱ्याच शेतकरी वर्गाची अशी तक्रार आहे की केळी ची शेती करून काही फायदा होत नाही. परंतु भुदरगड येथील शेतकऱ्याने हे खोटे ठरवले आहे. आणि आजूबाजूच्या शेतकरी वर्गासमोर आदर्श निर्माण केला आहे. भुदरगड येथे राहणारे तरुण आणि प्रगतशील शेतकरी किसन महादेव सोकासने यांनी आपली 30 गुंठे जमिनीत केळीची लागवड केली. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनी त्याला वेड्यात काढले परंतु त्याच 30 गुंठे क्षेत्रातून किसन महादेव सोकासने या तरुण शेतकऱ्याने जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
काही लोकांकडे भरगच्च जमीन असून सुद्धा एवढे उत्पन्न निघत नाही. शेतीमध्ये योग्य नियोजन तसेच खतांचा वापर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्र सामग्री आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कष्ट करण्याची तयारी खूप आवश्यक असते. या सर्वांच्या मदतीने किसन महादेव सोकासने यांनी कमी क्षेत्रातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन शेतकरी वर्गासमोर एक आव्हान सुद्धा उभे केले आहे.किसन महादेव सोकासने यांनी कोळवण-मिणचे रस्त्यावरील तांबोळा नावाच्या शेतात यंदा च्या वर्षी ३० गुंठे क्षेत्रात पुण्यातील बावचकर टेक्नॉलॉजी येथून ‘जी ९’ जातीची १२०० केळीची रोपे आणून शेतात लावली. त्या केळीसाठी त्यांनी शेणखताच्या आणि कोंबडी खताच्या 12 ट्रॉली घालून त्याची योग्य जोपासना केली. याचबरोबर त्यांनी रासायनिक खतांचा वापर सुद्धा केला. तसेच सर्व क्षेत्रात ठिबक सिंचन सुद्धा केले आणि कमी पाण्यावर केळीचे भरघोस उत्पन्न घेतले.
किसन महादेव सोकासने यांनी आपले १२ वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले. किसन महादेव सोकासने हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. घरच्या वाट्याला आलेली 30 गुंठे जमिनीला ठिबक सिंचन करून त्यात केळीच्या1200 रोपांची लागण केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून तसेच आंतरमशागत आणि आंतरपीक पद्धती चा वापर आणि खत व्यवस्थापन, पीक संरक्षण यांची योग्य पद्धतीने काळजी घेऊन त्यांनी 30 गुंठे क्षेत्रातून जवळपास 3 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
Share your comments