सध्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. असे असताना मात्र अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवतात. यामुळे ते चर्चेत असतात. असेच काहीसे कळंब तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. त्यांचा प्रयोग बघून सुरुवातीला अनेकांनी त्यांना हिनवले तसेच येड्यात काढले.मात्र आता त्यांचे प्रयोग बघायला अनेकजण आवर्जून येत आहेत. कळंब तालुक्यातील बोर्डा येथील शितल चव्हाण आणि दिनेश चव्हाण यांनी (Polyhouse Farming) पॉलिहाऊस उभारुण बेडच्या मदतीने जेरबेरा बाग फुलवली आहे.
असे असताना मात्र जमिनीतून रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांनी मातीऐवजी (In the cistern) कुंड्यामध्ये थेट कोकोपीट टाकून जेरबेराची लागवड केली होती. अनेकांना हे हास्यस्पद वाटले. आता कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला असून 20 गुंठ्यामध्ये जेरबेरा बहरलेला आहे. हा प्रयोग नाविन्यपूर्ण असला तरी अनेक तरुण शेतकऱ्यांना प्ररेणादायी आहे. शेती व्यवसयात बदल होतोय हे सत्य असले तरी (Soilless agriculture) मातीविना शेती हे अतियोशक्ती वाटत असेल, पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे या तरुणांच्या बाबतीत खरे ठरले आहे.
या तरुण शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहून सुरवातीच्या काळात त्यांना हिनवण्यात आले पण त्यांच्या यशोगाथेनंतर टीका करणारेच आता डोक्यावर घेत आहेत. यामुळे आता त्यांचे कौतुक केले जात आहे. या अनोख्या प्रयोगाला ग्रहण लागले ते रोगराईचे. त्यामुळे उत्पादनात घट आणि हा प्रयोगच अयशस्वी होणार असेच चित्र निर्माण झाले होते. यामुळे त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आहे. त्यांनी अभ्यास केला की मातीमधूनही रोगराईचा प्रादुर्भाव होतो.
असते असताना मातीशिवाय शेती कशी? असा प्रश्न देखील उपस्थित झाला. पण यावर पर्याय म्हणून त्यांनी कुंड्यामध्ये कोकोपीट टाकून जेरबेराची लागवड केली. त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. माती ऐवजी कोकोपीटचाच वापर वाढला जात आहे. त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी होत आहे पण किटकनाशकांचा वापरही कमी झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. यामुळे आता ही शेती फायदेशीर ठरली आहे.
तीन महिन्याच्या कालावधीत किटकनाशकांचा वापर खूप कमी वेळा करावा लागला आहे. त्यामुळे खर्चही कमी झाला आहे. भविष्यात अशा पध्दतीचे प्रयोग वाढतील. काळाच्या ओघात शेतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. आणि या बदलाची नांदी ग्रामीण भागातून सुरु होत आहे, यामुळे आता गावातील शेतकरी देखील असे प्रयोग करत असल्याने याबाबत आनंदच आहे.
Share your comments