1. यशोगाथा

सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख

भारतात आता शेती क्षेत्रात मोठा बदल होत आहे देशातील शेतकरी आता जागरूक होत आहेत. पारंपारिक पिकांना (Traditional crops) फाटा देत नगदी पिकांची (Cash Crop) लागवड करीत आहेत आणि चांगला नफा कमवत आहेत. आता तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत आहे. हरियाणातील (Hariyana) हिस्सार जिल्ह्याच्या मौजे सालेमगढ येथे राहणारा 24 वर्षीय विकास वर्मा याने देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि मशरूम शेती (Mushroom Farming) करण्यास सुरुवात केली. विकास यांनी 45×130 फूट आकाराच्या चार फर्ममध्ये मशरूमची लागवड केली आहे. या चार फार्म मधून त्यांना वर्षाला 30 ते 40 लाखांचा नफा मिळत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख

सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख

भारतात आता शेती क्षेत्रात मोठा बदल होत आहे देशातील शेतकरी आता जागरूक होत आहेत. पारंपारिक पिकांना (Traditional crops) फाटा देत नगदी पिकांची (Cash Crop) लागवड करीत आहेत आणि चांगला नफा कमवत आहेत. आता तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत आहे. हरियाणातील (Hariyana) हिस्सार जिल्ह्याच्या मौजे सालेमगढ येथे राहणारा 24 वर्षीय विकास वर्मा याने देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि मशरूम शेती (Mushroom Farming) करण्यास सुरुवात केली. विकास यांनी 45×130 फूट आकाराच्या चार फर्ममध्ये मशरूमची लागवड केली आहे. या चार फार्म मधून त्यांना वर्षाला 30 ते 40 लाखांचा नफा मिळत आहे.

विकास सांगतो की, 2016 मध्ये जेव्हा तो 12वी नापास झाला तेव्हा त्याला पुन्हा अभ्यास करण्याची इच्छा नव्हती. कुटुंबातील लोक पूर्वीपासूनच शेती करायचे, त्यामुळे त्याला शेतीशी संबंधित लहान-मोठे बारकावे माहीत होते. म्हणुनच भविष्याची चिंता न करता विकास शेतीत उतरला. वयाच्या 24 व्या वर्षी विकास यांनी वेदांत मशरूम नावाची कंपनी स्थापन केली आहे. कंपनीची उलाढाल 70 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. विकास अजूनही मशरूम उत्पादन घेत आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विकास यांच्यासाठी मशरूम शेतीची सुरुवात एवढीही सोपी नव्हती. विकास यांनी सांगितले की, सुरवातीच्या काळात त्यांच्यासमोर अनेक समस्या आल्या. त्यांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. पारंपरिक पद्धतीने शेती करायचे तेव्हा त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आणि त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावे लागले.

यामुळे विकास यांनी घरातील सर्व सदस्यांना मशरूम शेतीबद्दल सांगितले तेव्हा सर्वांनी त्यांना साथ दिली. मशरूम शेतीसाठी विकास यांनी आपल्या मित्राला व्यवसायात पार्टनर बनवले. अगदी कमी माहितीत विकास यांनी मशरूमची लागवड सुरू केली. मशरूम शेतीच्या माहितीचा अभाव असल्याने त्यांना सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. विकास यांचा मित्र देखील पार्टनरशिप सोडून निघून गेला. पण जिद्दी विकासने हार मानली नाही. कुटुंबीयांच्या पाठिंब्याने पुन्हा त्यांनी मशरूमची शेती सुरू केली आणि आज त्यांना 35 ते 40 लाखांचा वार्षिक नफा मिळत आहे.

विकास सांगतो की, जेव्हा तो सोनीपतला गेला होता तेव्हा पहिल्यांदा मशरूम शेतीची त्याला माहिती मिळाली होती. तेथे त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मशरूम शेती करताना पाहिले. खरं पाहता विकास यांनी बटन मशरूमपासून सुरुवात केली होती, पण त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ मिळत नव्हती. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले होते. मग त्याने मशरूम कोरडे करून विकण्याचा प्रयत्न केला पण तरीही मशरूम विकण्यात त्याला यश आले नाही. कंपोस्ट तयार करताना अनेक चुका केल्या. त्यामुळे मशरूम शेतीमध्ये सुरवातीला त्याला खूप नुकसान सहन करावे लागले.

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, बटन मशरूमचे शेल्‍फ लाइफ महत्प्रयासाने 48 तास असते. म्हणुन मशरूमची विक्री वेळेवर झाली नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. असाच फटका विकास यांनादेखील बसला होता. यामुळे त्यांनी याबाबत कृषी तज्ज्ञांशी चर्चा केली. तेथे त्यांना ऑयस्टर मशरूमचे उत्पादन करण्याचा सल्ला देण्यात आला. या ऑयस्टर मशरूमची खास गोष्ट म्हणजे या जातीचे मशरूम उन्हाळ्यातही पिकवता येते. यासाठी एसी रूमची गरज नसते. एवढं करूनही त्याला मशरूम विकायला मार्केट मिळालं नाही.

विकास सांगतात की, याला सामोरे जाण्यासाठी त्यांनी मशरूमवर प्रक्रिया करून बिस्किटे, पेय आणि चिप्स सारखे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. यामुळे याला बाजारात विकणे सोपे झाले तसेच याला चांगला दर देखील मिळत आहे. जे मशरूम ते 700 रुपये किलोने विकायचे, आता त्याच एक किलो मशरूमवर प्रक्रिया केल्यावर सुमारे 8000 रुपये मिळतात. यामध्ये त्याला 6000 हजारांपर्यंत नफा मिळत आहे. यासोबतच तो महिलांना मशरूमवर प्रक्रिया करून उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षणही देत ​​आहे. याचा त्याला लाभ तर मिळत आहेच शिवाय महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

English Summary: Initial loss of Rs 15 lakh; However, today it is earning Rs 40 lakh a year Published on: 19 April 2022, 06:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters