सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत. याचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत असतो. तसेच अलीकडच्या काळात अनेक पालेभाज्या या अनेक प्रकारची औषधे मारून पिकवली जात आहेत. याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे. यामधून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण आपल्या घरीच अगदी छोट्या जागेत घरगुती नैसर्गिक शेती करत आहेत. याचा फायदा होत असून पैसे देखील वाचत आहेत. यामुळे हे फायदेशीर आहे. आता सुभांगी यशवंत जगदाळे रा. माळेगाव खुर्द शारदानगर ता. बारामती जि. पुणे यांनी स्वतःच्या दोन गुंठे जागा मध्ये 'शुभांगीज फ्रेश व्हेजीज' या अंतर्गत वर्षभर लागणारा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकांची लागवड या ठिकाणी केली आहे.
यामुळे याचा त्यांना फायदा होत आहे. दररोजच्या जेवणात स्वतः पिकवलेला सेंद्रिय किंवा विषमुक्त भाजीपाला खाणे व त्यांची चव व खाताना जो आनंद होतो तो शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळे दररोजचा त्यांचा मोकळा वेळ कसा जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि फ्रेश भाजीपाला खायला मिळतो. त्यांची दोन्ही मुले शंभूराज व साईराज यांनाही आत्तापासून शेती करण्याची गोडी लागली आहे. यामुळे आता त्यांची घरगुती खर्चासाठी मोठी बचत देखील होत आहे. आणि अनेक आजार देखील जडण्याची शक्यता कमी आहे.
त्यांनी केवळ दोन गुंठ्यात दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला म्हणजेच मिरची, कांदा, लसूण, वांगी, कोथिंबीर, पालक, मेथी, चाकवत, तांदुळजा, अळू, पुदिना, भोपळा, भेंडी, घेवडा, वाटाणा, पावटा, राजमा, काकडी, गाजर, बीट, कोबी, बटाटे, फ्लॉवर, ब्रोकोली, स्वीटकॉर्न, शेवगा, कढीपत्ता, लाल कोबी, मोहरी, भुईमूग, तसेच फुल झाडे गुलाब, मोगरा, शेवंती, कुंद सारखी व फळांमध्ये आंबा, पपई, नारळ, पेरू, डाळिंब, इत्यादी पिकांची लागवड केली आहे, यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अनेकजण त्यांच्या या घरगुती शेतीला भेट देण्यासाठी आवर्जून भेट देत असतात.
त्यांची मुले आणि पती देखील त्यांना या कामात मदत करत असतात, यामुळे त्यांनी हे सगळे फुलवले आहे. यासाठी त्यांनी मोठी मेहनत केली आहे. सध्याच्या काळात सध्याच्या काळात सर्वांनाच विषमुक्त भाजीपाला खाऊन प्रत्येकाला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे व कोरोनाला पळवून लावायचे आहे. यामुळे अनेकांनी असेच घरगुती भाजीपाला करायचे ठरवले तर दवाखाना देखील बघायची वेळ येणार नाही. यामुळे आपले पैसे देखील वाचणार आहेत.
Share your comments