
in himachal farmer cultivate yellow and purpul cabbige and get good rate in market
हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी जिल्ह्यातील बलह व्हॅली मधील एका शेतकऱ्याने चक्क स्वित्झर्लंड मध्ये पिकवल्या जाणाऱ्या पिवळे आणि जांभळा फुलकोबी चे उत्पादन घेतले आहे.
जरी या कोबीचे आरोग्यदायी फायदे पाहिले तर अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची क्षमता म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी याकोबी चा उपयोग होतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. गर्भवती महिलांसाठी देखील खूप उपयुक्त आहे.
याकोबी मध्ये अँटिऑक्सिडंट, पोषण मूल्य, फास्फोरस, मॅग्नेशियम, जस्त आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक मानवी शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. जर आपण सर्वसामान्य लावतो त्या पांढरा कोबी च्या तुलनेत बाजारभावाचा विचार केला तर सध्या पांढऱ्या रंगाच्या कोबीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळत आहे.
तर तुलनेत पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या कोबीला 60 ते 80 रुपये किलो भाव मिळत आहे. बलह खोऱ्यातील प्रगतिशील शेतकरी दिनेश यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे सहा एकर जमिनीवर स्विस लागवड केली आहे.
बियाणे परदेशी कंपनीकडून आणले होते. युट्युब वरून या कोबी ची लागवड पद्धत आणि व्यवस्थापन याविषयी त्यांनी माहिती घेतली. असतात यावर काम केले. याविषयी ते म्हणतात कि मी, पांढरा, पिवळ्या आणि जांभळ्या कोबीची लागवड करत असून आहे.
इतर शेतकऱ्यांना लागवडीसाठी केले जाणार प्रवृत्त
कृषी विभागाचे जिल्हा मंडळीचे उपसंचालक राजेश डोगरा यांनी सांगितले की, बलह येथील शेतकऱ्याने गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या कोबीचे उत्पादन घेतले आहे. विभागाचे पथक त्यांच्याशी संपर्क साधून इतर शेतकऱ्यांना देखील लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
ही कोबी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणिपौष्टिक असण्यासोबतच ती गर्भवती महिलांसाठी देखील उपयुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नक्की वाचा:Gold Price Today: सोन्याच्या दरात 5 हजाराची घसरण, 29,954 रुपये प्रति 10 ग्रामचा भाव
Share your comments