आपल्याला माहित आहेच की प्लास्टिक कचरा ही आपल्याकडे ज्वलंत समस्या आहे. यामुळे वातावरणावर देखील खूपच विपरीत परिणाम होतो. जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर विश्वास पटणार नाही अशीप्लास्टिक कचऱ्याचे समस्या आहे.
भारतात दर वर्षी 150 लाख टन कचरा तयार होतो. त्यातील बराच कचरा हा समुद्रात वाहून जातो. या प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या प्लास्टिक कचर्या मधून खूपच कमी कचरा हा रीसायकल केला जातो. परंतु आता बऱ्याच प्रमाणात प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्या आणि त्याबाबत जनजागृती वाढीस लागली आहे. बरेच स्टार्टअप भारतामध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर काम करीत आहेत. या लेखामध्ये आपण कशास आमच्या तीन मित्रांची गोष्ट वाचणार आहोत ज्यांनी चकल्या प्लास्टिक कचऱ्यापासून विटा तयार केल्याआहेत.
आसामच्या या तिघा मित्रांनी तयार केले प्लास्टिक कचरा पासून विटा
मौसम, डेव्हिड आणि रूपेशहे तिघे मित्र आसाम राज्यातील आहेत. तिघेही सिव्हिल इंजिनिअर असून इंजिनीअरिंगचा अभ्यास करत असताना त्यांच्या मनात स्वतःचा स्टार्टअप सुरु करण्याचा विचार आला.
इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू असताना इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षी इको फ्रेंडली वस्तू तयार करण्याचा प्रकल्प त्यांना मिळाला. यातूनच त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून विटा तयार करण्याची संकल्पना रुजवली व त्यावर काम सुरू केले. या कामासाठी त्यांनी 2018 मध्ये जीरंड नावाची कंपनीची नोंदणी केली. याबाबतीत माहिती देताना त्यांनी म्हटले की, प्लास्टिक कचऱ्यापासून विटा तयार करण्यासाठी लागणारा एक फॉर्म्युला तयार केला आहे व त्या फॉर्मुलाचेपेटंट देखील त्यांना मिळाले आहे. मध्ये ते अगोदर प्लास्टिक कचऱ्यापासून पावडर तयार करतात व त्यानंतर थर्मल पावर प्लांट मधून निघणाऱ्या वेस्टेज मध्ये ती पावडर मिसळली जाते व त्यामध्ये केमिकल व सिमेंट टाकले जाते. या सगळ्या पदार्थांच्या मिश्रणातून तयार केली जाते. यामध्ये 50 टक्के वेस्ट मटेरियल असते.वीट तयार तयार व्हायला अठ्ठेचाळीस तास लागतात.या तिघा मित्रांनी प्लास्टिक पासूनविटांची निर्मिती केल्यानंतर त्या विटांच्या मार्केटिंग लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये त्यांनी थेट ग्राहकांशी संपर्क साधणे यावर भर दिला.
त्यामुळे त्यांच्या उत्पादनाची माहिती हळूहळू लोकांपर्यंत पोहोचली व काही बिल्डर्सकडून मागणी येऊ लागल्याने मौसम यांनी सांगितले. सद्यस्थितीत दररोज हजारांपेक्षा जास्त विटा ते तयार करतात. त्यांच्या या विटांना ईशान्येकडील राज्यांमध्ये नाहीतर अन्य राज्यातूनही मागणी वाढत आहे. या तिघांनी एनजीओ आणि थर्मल पावर प्लांट सोबत स्वतःला जोडून घेतले आहे. एवढेच नाही तर या स्टार्टअपच्यामाध्यमातून त्यांनी शंभर लोकांना रोजगार देऊ केला आहे.(स्रोत-सामना )
Share your comments