ग्रामीण भागात ज्याठिकाणी पाण्याची फार कमी भासते अशाठिकाणी शेतीकरणे खूप जोखीमीचे काम आहे . पण देविदास नारायण बादल यांनी कमी संसाधनांचा वापर करून शेळीपालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखविला आहे आणि यामुळे त्यांना चांगला नफा देखील होत आहे तसेच ते इतर लोकांना सुद्धा शेळीपालनाचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत आहेत . देविदास नारायण बादल आज आपल्याला शेळी चाराविषयी महत्वाची माहिती देत आहेत . जाणून घ्या शेळी चारासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड केली जाते .
शेळी चारासाठी या तीन वनस्पती फार महत्वाच्या आहेत :
सुबाभूळ ,शेवरी आणि हादगा या तीन वनस्पती बद्दल देविदास नारायण बादल कशी लागवड करावी आणि कधी झाडाची कापनी करणे आवश्यक आहे हे सांगतील . सुबाभूळ बीज प्रक्रिया दशरथ घास बीज प्रक्रिये प्रमाणे आहे . प्रथम १ किलो सुबाभूळ बीज साठी २ लिटर पाणी एका पातेल्यात गरम करून घ्यावे पाणी उखळल्यानंतर २ ते ३ मिनिटं पाणी स्थिर होऊद्या त्यात सुबाभूळ बीज १५ मिनिटे ठेऊन पूर्ण रात्र थंड पाण्यात ठेवा . सकाळी या बीज पाण्यातुन काढून लागवडीस वापरू शकता हि बीज प्रकिया फक्त सुबाभूळ साठी आहे शेवरी किंवा हादगा या वनस्पतीसाठी नाही.
बीज रोपणी:
तुम्ही मिक्स बीज रोपणी सुद्धा करू शकता जसे सुबाभूळ ,शेवरी आणि हादगा एकदाच . शक्यता तुम्ही ५ बाय डिड फुट सुबाभूळ बीज रोपणी करताना दोन ओळीतील अंतर साधारण ५ फुट असावे आणि बीजामधील उभ्या ओळीतील अंतर डिड फुटापर्यंत असावे . प्रत्येक ओळीला डिड फुट असे २-३ बियाणे लावा . नंतर झाडाची चांगली वाढ झाल्यावर झाड किमान ५-६ फुट होऊद्या . झाडाला अडीज फुटावरून कट करावे कारण नंतर याठिकाणी झाडाला चांगल्या फांद्या निघतील . तुम्ही हे तीन वेळा करण्याची आवश्यक्यता आहे यामुळे शेळीला भरपूर चारा मिळेल . शेवरी आणि हादगा झाडांसाठी सुद्धा तुम्ही हिच पद्धत वापरू शकता .
फेसबुकवर https://fb.watch/24rDAlq23h/ या लिंकवर तुम्ही देविदास नारायण बादल यांचा व्हिडिओ पाहू शकता
शेळी विकत घेताना घेण्याची काळजी :
शक्यतो २-३ वेत झालेली शेळी विकत घ्या आणि शेळी तुमच्या जवळच्या भागातील ,साधारण तुमच्या जवळच्या परिसरातील घ्या ,शेळी लांब पाठीची ,उंच ,रुंद असावी सुरुवातीला याप्रमाणे तुम्ही तुमचा गोट फार्म सुरु करू शकता . चारा बियाणे जी शेळी फार आवडीने खाते आणि यामुळे त्यांची वाढ देखील जोमाने होते . १>मेथी घास बियाणे साधारण ३ वर्ष चालते.२>हादगा भरपूर वर्ष चालते शेळीसाठी फार पौष्टिक खाद्य आहे. ३>सुबाभूळ १० ते १५ वर्ष चालते ४>शेवरी ४ वर्ष चालते ५>दशरथ घास ५ वर्ष चालतो आणि शेळी याला फार आवडीने खातात .
अधिक माहितीसाठी तुम्ही देविदास नारायण बादल यांना कॉल करू शकता :या नंबरवर ९६९१९१९१६०
देविदास नारायण बादल
शिवनेरी गोट फार्म अँड सीड्स
Share your comments