1. यशोगाथा

शेतकऱ्यांनो ऊस लावायचा आहे तर काळा ऊस लावा, मोठी मागणी असल्याने उत्पादन वाढले..

राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक महिने झाले तरी उसाला तोड येत नसल्याने आता त्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकरी राज्यात उसाची लागवड करत आहेत. यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
black sugarcane

black sugarcane

राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक महिने झाले तरी उसाला तोड येत नसल्याने आता त्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकरी राज्यात उसाची लागवड करत आहेत. यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र दरवेळी एकच पीक घेतल्याने अनेकदा अडचणी निर्माण होता आहेत. असे असताना आता विदर्भात देखील लागवड वाढली आहे. राज्यातील वाशीम शहरात एक गाव आहे जिथे विदेशी काळ्या रंगाच्या उसाची लागवड केली जाते. मौजे काटा हे गाव आहे जिथे काळ्या ऊसाची लागवड केली जाते. तसेच इतर उसाच्या तुलनेत याला मोठी मागणी असल्याने तो लगेच तोडून नेला जात आहे.

महाराष्ट्रात हे गाव काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी खूप जास्त प्रसिध्द आहे. अनेक वर्षांपासून येथे याची लागवड केली जाते. मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी १८ व्या शतकात विदेशातून काळा ऊस आणला होता. त्यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते. कालंतराने तेच वाण काटा या गावातील तत्कालिन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरूवात केली. म्हणुनच या ऊसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हटले जाते. कालांतराने अनेकांनी याची लागवड वाढल्याने क्षेत्र वाढले.

काळा ऊस आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे अनेक फायदे आहेत. सध्या हा काळा ऊस येथील शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांना चांगले दिवस दाखवत आहे. काळ्या ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. सध्या इतर ठिकाणी लावला जाणारा ऊस हा मोठ्या प्रमाणावर लावल्याने तो तोडून जाण्यासाठी ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या मागे लागावे लागत आहे. तसेच ज्यादाचे पैसे देखील द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

मौजे काटा गावातील शेतकऱ्यांना यातून चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या काळ्या ऊसाला काळा बारामही मागणी मिळत आहे. महाराष्ट्रसह, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमध्ये या काळ्या ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याच्या लागवडीसाठी लागणारा ऊस देखील येथे उपलब्ध होत आहे. यामुळे याकडे वळण्यास काही हरकत नाही. भारतात सर्वात आधी नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते.

English Summary: If farmers want to plant sugarcane, then plant black sugarcane. Due to high demand, production has increased. Published on: 05 February 2022, 04:05 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters