सध्या शेतीमध्ये आणि पीकपद्धती मध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. शेतीतून अधिक चे उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच नवनवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवस्थापन खूप गरजेचे आहे.सर्वसाधारण पणे आपण कडीपत्याचा उपयोग जेवण बनवताना मसाल्याचा पदार्थ म्हणून करतो. कडीपत्याचा वापर केल्यामुळे अन्न रुचकर आणि चविष्ट सुद्धा लागते. कडीपट्याला मसाल्याचा एक प्रकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. बाजारात या कडीपत्याला प्रचंड प्रमाणात मागणी सुद्धा आहे. त्यामुळे कडीपत्याची शेती करून सुद्धा तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता ते पण अत्यंत कमी कष्टामध्ये.
30 गुंठे रानात कडीपत्ता:
पळसदेवचे प्रगतशील शेतकरी संतोष काळे यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रातून कडीपत्ता लागवडीमधून 4 लाख रुपये कमावले आहेत. त्यामुळे अवती भोवताली च्या परिसरात या शेतकऱ्याचा नावाचा डंका वाजत आहे. संतोष काळे यांनी आपल्या 30 गुंठे उसाच्या रानात कडीपत्ता लावण्याचे ठरवले. यामागे कारण सुद्धा तसेच आहे. दरवर्षी ऊस तुटून गेल्यावर उसाच्या बिलाची कित्येक दिवस वाट पहावी लागत होती त्या वैतागाला कंटाळून संतोष काळे यांनी कडीपत्याची लागवड केली.कडीपत्ता लागवडीसाठी संतोष काळे यांनी कडीपत्याचा बियांची खरेदी कर्नाटक मधून केली.खरेदी केल्यानंतर जून महिन्यात वातावरण थंड असल्याने व्यापारी तत्वावर कडीपत्याची लागवड केली. शेतीची योग्य पद्धतीने मशागत करून चार फूट अंतरावर बेड तयार करून कडीपत्याची बियांची लागण केली.सुरवातीला संतोष काळे यांना शेतीच्या मशागतीसाठी साधारणतः पाच ते सहा हजार रुपये एवढा खर्च झाला.
तसेच एक एकर क्षेत्राला 100 किलो बियाणे लागते म्हणून 30 गुंठे क्षेत्रासाठी संतोष काळे यांनी 75 किलो बियाणी 200 रुपये दराने खरेदी केले तसेच लागवडीनंतर फवारणी, खते, रासायनिक खते आणि टॉनिक तसेच दरवर्षी 2 ट्रेलर शेणखत आणि तनापासून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे असते. योग्य काळजी घेतल्यास 8 ते 10 महिन्यांच्या काळातच पीक तोडणी ला येते.
होणार खर्च:-
कमी कष्टामध्ये कडीपत्याची शेती करून मुबलक पैसे कमवू शकता. कडीपत्याला दर 15 दिवसांनी औषध फवारणी ची गरज असते 15 दिवसाला फवारणीचा खर्च हा 600 ते 700 रुपये होतो वर्षं भरात कडीपट्याला अंदाजे 24 ते 25 फवारण्या केल्या जातात. त्यामुळे याचा खर्च 18 ते 20 हजार रुपये एवढा होतो तसेच शेणखत चा खर्च ला 5 हजार रुपये होतो एकंदरीत पीकलागवडीपासून ते काढणीपर्यंत 50 हजार रुपये खर्च होतो.कडीपत्याची एकदाच लागवड करून शेतकरी वर्षोनुवर्षे त्यापासून उत्पादन मिळवू शकतो. पिकाची तोडणी झाल्यावर कडीपत्याला बाजारात विकण्यासाठी नेण्याची गरज नसते तसेच कडीपत्ता खरेदी साठी पुणे मुंबई मधील व्यापारी वर्ग रानातच येतो. कडीपत्या शेती मध्ये आपण 25 टक्के खर्च आणि 75 फायदा मिळवू शकतो.
पळसदेव मधील संतोष काळे यांना कडीपत्याचा पहिल्या तोड्याच्या वेळेस 7 टन माल निघाला. त्याला वेळी त्यांना 14 हजार रुपये एवढा भाव मिळाला. लगेच चार महिन्यांनी परत तोडणीला 7 टन माल निघाला, त्याला 18 हजारांचा भाव मिळाला व या वेळेस 30 हजार रुपये भाव मिळाला व 7 टन माल निघून दोन लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण दीड वर्षात संतोष काळे यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामधून खर्च वगळता त्यांना तब्बल 3 लाख 25 हजार रुपयांचा फायदा झाला. या 30 गुंठे क्षेत्रात त्यांनी 75 हजार रुपये खर्च केला होता.
Share your comments