भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. भारताची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती वर डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट अवलंबून आहे. अनेक युवक शेतकरी शेतीतून करोडो रुपयांची कमाई देखील करत आहेत. असे व्यक्ती इतर व्यक्तींसाठी एक आदर्श म्हणून काम करतात, आज आपण अशाच एका शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील यजूआर गावातील रहिवासी यतेंद्रनाथ झा यांचा जीवन प्रवास खूपच रोचक आहे. यतेंद्रनाथ यांना लहानपणापासून शेती विषयी खूप प्रेम होते. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण देखील केले, पण शेती करण्याची त्यांची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती, शेवटी त्यांनी निर्णय घेतला कि ते शेती करणार. पुढे चालून त्यांना शेतीलाच त्यांचे करिअर म्हणून निवडले. सध्या ते जैविक शेती करून हफ्त्यातील एक दिवस दिल्लीच्या एनसीआर मधील कुपोषित बालकांना मोफत भाजीपाला देत आहेत. येतेंद्रनाथ अनेक लोकांना जैविक शेतीसाठी पुरस्कृत करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन देखील करत आहेत.
हा अवलिया शेतकरी चालवतो एक संस्था
यतेंद्रनाथ जैविक गुरुग्राम या नावाने एक संस्थादेखील चालवतात, ही संस्था शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या वापराचे विपरीत परिणाम समजावून सांगण्याचे कार्य करते तसेच रासायनिक खतांमुळे कसे मानवाला विविध आजार जखडत चालले आहेत या विषयी शेतकऱ्यांना पटवून देत आहे. शिवाय ही संस्था शेतकर्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहित देखील करते या संस्थेअंतर्गत 12 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार गावातील सुमारे ऐंशी एकर जमिनीवर जैविक शेती ला सुरुवात केली आहे, हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर टाळतात व जैविक खतांचा वापर करून भाजीपाला पिकांची शेती करतात. अनेक नागरिक या संस्थेद्वारे पिकविण्यात आलेल्या भाजीपाल्यांची खरेदी करतात, त्यामुळे लोकांना चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला उपलब्ध होत आहे.
तसेच नागरिकांना यामुळे भाजीपाला खरेदीसाठी भाजी मार्केटमध्ये जाण्याचे काहीच कारण राहिलेले नाही यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे शिवाय त्यांना जैविक पद्धतीने उगविण्यात आलेला भाजीपाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिक आनंदी असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या या 80 एकरावरती कांदा, लसूण,सिमला मिरची, अद्रक, पालक, टोमॅटो, काकडी भेंडी इत्यादी भाजीपाला पिकांची शेती केली जात आहे.
कमी खर्चात अधिक उत्पादन
जैविक पद्धतीने उगवला गेलेला भाजीपाला अधिक दिवस साठवला जाऊ शकतो. तसेच या पालेभाज्या खायला देखील खूपच स्वादिष्ट असतात. झा यांची संस्था आता एक मोठी कंपनी बनली आहे, आणि त्यांना यातून वर्षाकाठी एक करोड पर्यंत कमाई देखील होते. त्यांच्या संस्थेत अनेक जैविक शेतीचे विशेषज्ञ लोक येतात आणि लोकांना जैविक शेती विषयी जागृक करतात. झा यांचे हे कार्य खरच खूप कौतुकास्पद आहे, इतर शेतकऱ्यांनी देखील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि जैविक शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे.
Share your comments