गोमूत्र औषध निर्मितीतून गाठले यशाचे शिखर; वाचा ! सुहास पाटलांची यशोगाथा

13 July 2020 07:30 PM By: भरत भास्कर जाधव


पशुपालन म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते, दूध व्यवसाय आणि शेण खत. पशुपालनात या दोन्ही व्यवसायात बक्कळ पैसा आहे, पण यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. त्यामागचे सर्व गणित समजून घेऊन दुधाचा व्यवसाय करावा लागतो. पण बऱ्याचवेळा अभ्यास नसल्याने आणि काय करावे कसे करावे याची माहिती नसल्याने नुकसान सोसावे लागते. यामुळे दूध व्यवसायासह आपल्याला अजून काय करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर काम केले पाहिजे. जेणेकरून आपण या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावू शकू.

नेहमीच्या दूध व्यवसायाची रीघ तोडत सांगली जिल्ह्यातील सुहास पाटील यांनी गो- मूत्र आणि शेणावर प्रयोग करत एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या या नव्या व्यवसायाने युवकांसमोर नवा आदर्श ठेवला. आज आपण आपल्या लेखात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात अससलेले औदुबर या गावातील सुहार प्रभाकर पाटील यांची यशकथा जाणून घेणार आहोत. सुहास पाटील यांनी वाणिज्यमधून (बी.कॉम) पदवी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात असलेल्या औदुंबर या गावा गोपालनंदन नावाची गो-शाळा चालवतात. 

मला काय करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर शोधत शोधत सुहास पाटील यांनी देशी गायीपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ दुधाचा व्यवसाय केल्यानंतर अर्थशास्त्र बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी गोमूत्र आणि शेणातून औषध निर्मितीच्या व्यवसाय सुरू केला. यासोबत ते दूध आणि तुपाचा देखील व्यवसाय करत आहेत. गेल्या वीस वर्षापासून ते या व्यवसायात आहेत, या व्यवसायात त्यांनी पुर्ण शास्त्र अवगत केले असून ते आता युवकांना याचे प्रशिक्षणदेखील देतात. साधरण सर्वच क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येत असतात. सुरुवातीच्या काळात फोटोग्राफीचा छंद जोपासणारे सुहास यांना गावात राहून काही तरी काम करायचे होते. पण काय करावे हे कोणता व्यवसाय करावा हा मार्ग त्यांना सापडत नव्हता. फोटोग्राफी करत असताना ते एका कार्यक्रमात फोटो काढण्यासाठी गेले होते. तो कार्यक्रम काही देशी गायीविषयी माहिती देणारा होता.


या कार्यक्रमात त्यांना देशी गाई पालनाची कल्पना सुचली. देशी गाई पालनातून दूध व्यवसाय करायचा असा निश्चय त्यांनी केला. त्या कार्यक्रमापासून गोपलनंदन या गोशाळेचा प्रवास सुरू झाला.  देशी गाईनंतर त्यांनी हळूहळू गीर, सहिवाल या जातीच्या गाई आपल्या गो-शाळेत आणल्या, परंतु दुधाचे अर्थशास्त्र कुठेतरी बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यानंतर त्यांनी दुसरा व्यवसाय सुरु करायचा विचार केला.  पण देशी गाईमध्ये काहीतरी जोड व्यवसाय असावा असा त्यांचा हट्टहास होता.  मग सुहास पाटील यांनी देशी गाई या विषयात अभ्यास केल्यानंतर औषध निर्मिती करण्याचा निर्धार केला.
सुहास पाटील म्हणतात, ''लोक दुधामागे आहेत पण, दूध हे फक्त बोनस आहे खरी बक्कळ कमाई ही फक्त गोमूत्र आणि शेणांमध्ये आहे''. गोमूत्रापासून आणि शेणापासून सुहास पाटील औषध तयार करतात.  साधे शेतीसाठी लागणाऱ्या गोमूत्राचा दर हा ५० रुपये लिटर आहे.  तर त्यातील अर्क काढला तर ते गोमूत्र ३०० ते ८०० रुपये लिटरने विकले जाते.  डोळ्यात टाकण्याचे औषधदेखील गोमूत्रपासून बनवले जाते, त्याची किंमत एका लिटरसाठी १५ हजार रुपये असल्याची माहिती पाटील यांनी दिली.


विविध आजारावरती गोमूत्रापासून औषध बनवले जाते.  पोटाचे विकार, रात्री झोप न येणे, केस गळणे, मंतीमंदपणा, पक्षाघात, या विकारांवर गोमूत्रपासून औषध बनवले जाते.  इतकेच काय मुळव्याधीसाठी सुद्धा औषध सुहास पाटील यांच्याकडे आहे. या औषधांना प्रचंड मागणी असते, साधारण या औषधाची किंमत १५ हजार रुपये आहे. हे दर पाहून नक्कीच आपल्याला याची कल्पना येईल की, दुधापेक्षा गोमूत्र भरपूर उत्पन्न देते.

'सध्या अनेकजण गोशाळा चालू करतात पण नेमके कशात काम करायचे आहे याची माहिती नसल्याने आणि त्या विषयातील अभ्यास नसल्याने गो-शाळा काही महिन्यातच बंद पडत असल्याचे, सुहास पाटील म्हणाले. नवीन गो-शाळा सुरू करणाऱ्यासाठी ते कार्यशाळा देखील घेतात.  ज्यांना या व्यवसायात उतरायचे आहे त्यांनी काही प्रश्न तयार केली पाहिजे, त्यांची उत्तरे काढून काम सुरू केले पाहिजे.  ''गो-शाळा का चालू करायची? काय काम करायचे आहे? आपल्याला सुरु करायचा असलेला व्यवसाय याची माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे काढल्यानंतर आपण कामाला सुरुवात करा'', असा सल्ला सुहास पाटील युवकांना देतात. तुपाचा व्यवसाय करताना आधी मागील गणित समजून घेतले पाहिजे.

आपण जर तुप औषधी गुण सांगून विकले तर नक्कीच याचा चांगला दर आपल्याला मिळेल. क शापद्धतीने याचा वापर केला गेला पाहिजे. जूने तुप आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा. विकताना आपल्याला याची माहिती असली पाहिजे. सुहास पाटील यांच्या गोशाळेत तयार होणाऱ्या तुपाला साधरण ३ हजार रुपये इतका दर आहे. तुप बनविण्याची पद्धत आणि त्याला ठेवण्याची पद्धत यात खूप मेहनत असल्याचे पाटील म्हणतात. नैसर्गिक पद्धतीने तूप तयार केले जाते यामुळे या तुपाला खूप मागणी असून भावही दमदार मिळतो.

बरेच लोक असतात जे तुप तयार करतात पण तूप विकल्या जात नाही. यामागे एक कारण असते व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला त्याची पुरेशी माहिती नसते. औषधी गुण काय आहेत याची कल्पना आपल्याला असायला हवी. दुधातही पैसा असतो पण आपण योग्य पद्धतीने व्यवसाय केला तरच त्यात आपल्याला पैसा दिसत असतो. दुधापासून तुम्ही तूप बनवून विकता, पण त्याला हवा तसा दर मिळत नाही.  यामुळे तुम्ही निराश होतात परंतु तुम्ही गवळी म्हणून व्यवसाय न करता औषधी गुण सांगून त्याची विक्री केली पाहिजे. तर आपल्याला मालाला चांगला भाव मिळेल असे सुहास पाटील म्हणतात.
अधिक माहितीसाठी आपण सुहास पाटील यांना सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपर्क करु शकता. किंवा त्यांच्या गोशाळेत जाऊन आपण त्यांच्याकडील औषधांची माहिती घेऊ शकता.

सुहास पाटील
मोबाईल - ७४४८२८५०००, ७०३८६२५०००.

gomutra medicine gomutra medicine success story sangli palus suhas patil सुहास पाटील गोमूत्र गोमूत्र औषध सांगली पलूस यशगाथा
English Summary: get success with help of gomutra medicine ; read suhas patils story

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.