एखादी नोकरी मिळणे किंवा व्यवसायामध्ये यश संपादन करणे आणि आपल्या आईवडिलांची असलेली आर्थिक परिस्थिती, ते करत असलेला व्यवसाय या पूर्णतः दोन भिन्न गोष्टी आहेत
ठीक आहे याच्यामध्ये आर्थिक परिस्थितीचा परिणाम या दृष्टिकोनातून खासकरून मुलांचा विचार केला तर त्यांच्या शिक्षणावर पडत असतो. कारण आपण समाजामध्ये पहात असतो की बरेच मुले शाळेत तसेच इतर ऍक्टिव्हिटी मध्ये खूप टॅलेंट असतात.
परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे बऱ्याचदा इच्छा असून देखील त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही. परंतु अशा परिस्थितीत देखील असे काही मुलं असतात की जे त्यांच्यात असऊसतोडलेली जिद्द, मेहनत, प्रयत्नांमधील सातत्य इत्यादी गुणांमुळे असलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करून स्वतःला इच्छित असलेले ध्येय प्राप्त करतात. याचेच प्रत्यंतर सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले.
ऊसतोड मजुरांची मुले बनली डॉक्टर
आता बीड जिल्हा म्हटले म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून उभ्या महाराष्ट्रात परिचित आहे. परंतु याच बीड जिल्ह्या मधील ऊस तोड काम करणाऱ्या मजुरांची चार मुले एमबीबीएसच्या अंतिम वर्षात घवघवीत यश संपादन करून डॉक्टर बनले आहेत.
या चारही मुलांचे पालकत्व आर्वी ( पुणे ) येथील शांतीवन या संस्थेने स्वीकारले होते. या सगळ्या परिस्थितीवर मात करत या मुलांनी हे घवघवीत यश संपादन केले. यामध्ये डॉक्टर झालेले मुलांची नावे स्नेहल नागरगोजे, रोहित चव्हाण, किरण तोगे आणि रामदास चपटे असे आहे.
त्यापैकी स्नेहल या शिरूर तालुक्यातील खांबा लिंबा येथील रहिवासी आहेत. त्यांनी नाशिक येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून यश संपादन केले तर रामदास चेपटे हे शिरूर मधील घुगेवाडी चे रहिवासी असून त्यांनी इस्लामपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले.
किरण तोगे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटे वाडी चे रहिवासी असून त्याने पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेज मधून यश मिळवले. त्यापैकी रोहित चव्हाण हे अल्पभूधारकशेतकऱ्याचे पाडले असून त्यांनी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सगळीच प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन या चौघांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या चारही मुलांना शांतीवन या संस्थेने त्यांचे पालकत्व स्वीकारले होते.
शांतीवन बद्दल थोडक्यात माहिती
शांतीवन ही संस्था आर्वी ता. शिरूर ( पुणे ) येथे असून या संस्थेच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्रकल्प आहेत. या विविधांगी प्रकल्पामध्ये तारांगण हा एक प्रकल्पापासून यामध्ये दहावी नंतरचे सर्व मुलांचे शिक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. सध्या या प्रकल्पामध्ये 100 पेक्षा जास्त मुले उच्चशिक्षित असून यामध्ये 16 विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्रात आहेत.
या एकूण 16 पैकी हे चौघे डॉक्टर बनले आहेत तर इतर मुले आयटीआय, इंजिनिअरिंग आणि नर्सिंग सारख्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिकत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Share your comments