जीवनात यश मिळवायचे असेल तर आपल्याला कष्ट हे करावेच लागते त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. याचे एक उदाहरण म्हणजे राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यात राहणारा एक तरुण शेतकरी योगेश जोशी. योगेश २००९ मध्ये सेंद्रिय शेतीचा डिफ्लोमा करत होता जे की घरच्यांची वाटत होते योगेश ने सरकारी नोकरी करावी मात्र योगेश ला शेतीच करायची होती. सुरुवातीला घरचे रागावले तर काही लोकांनी टोमणे मारले. परंतु योगेश ने आपले काम जवळपास ११ वर्ष चालू ठेवले. योगेश सोबत सुमारे ३ हजार शेतकरी ४ हजार एकरमध्ये जिरे, धने, बडीशेप तसेच मसाले चे पदार्थ पिकवून शेतकरी श्रीमंत झाले. योगेशच्या फार्म ची ६० कोटी रुपये उलाढाल आहे जे की अजून ५० लोक कामाला आले आहेत.
योगेशच्या घरच्यांची तसेच नातेवाईकांची ईच्छा होती की त्याने कृषी खात्यात काम करावे मात्र योगेश ला शेतीच करायची होती. अनेक लोकांनी सल्ला दिला होता की शेती करू नकोय परंतु योगेश कोणाचे ऐकले नाही. योगेश ला माहीत होते की जिरे पिकाला बाजारात मोठी मागणी तसेच जास्त किमंत आहे आणि उत्पादनही चांगल्या प्रकारात निघते. योगेश ने आपल्या २ एकर शेतीमध्ये जिऱ्याची शेती करण्यास सुरू केले.
योगेश ने सांगितले की शेती करताना सुरुवातीस अपयश आले जे की त्याच्या सोबत अजून ७ शेतकरी काम करत होते. त्या ७ शेतकऱ्यांना असे वाटत होते की युरिया, कीटकनाशके व अनेक रसायने पिकात घातल्याशिवाय उत्पादन भेटणार नाही. योगेश ने जोधपूर येथे जाऊन कजरी कृषी शास्त्रज्ञाशी संपर्क साधला. ते शास्त्रज्ञ योगेशच्या गावात आले आणि प्रशिक्षण दिले.
२००९ मध्ये योगेश ने जिऱ्याची शेती करण्यास सुरू केले त्यावेळी त्याची १० लाख रुपयांची उलाढाल होती. मात्र आताच्या स्थितीला योगेशच्या फर्म रॅपिड ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडची ६० कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्याच्या फार्मशी २ दुसऱ्या कंपन्या संलग्न आहेत जे की ३००० शेतकरी जोडले आहेत. सध्या हे ३ हजार शेतकरी ४ हजार एकर शेती करत आहेत. आपण घेतलेले पीक विकायचे असेल तर ऑनलाइन मार्कटिंग पण करावे लागते तसेच अनेक परदेशी कंपन्यांनसोबत संपर्क करावे लागतात. अलीकडे योगेश ने हैदराबाद येथील एका कंपनीसोबत ४०० टन क्विनोआची शेती केली आहे.
योगेशची कारकिर्दी सगळीकडे पसरली जे की अगदी जपानी कंपनीचे लोक त्याचा गावात आले व त्याच्या फर्म सोबत करार देखील केला. योगेच्या शेतीतील मसाले आता अमेरिकेत सुद्धा पोहचले आहेत. यामध्ये योगेश एकटाच पुढे चालला नाही तर सोबत शेतकऱ्यांना घेऊन निघाला आहे. मागील ७ वर्षांपासून १००० शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. सध्या योगेशचा फर्म ५० शेतकरी सांभाळत आहेत तसेच यामध्ये योगेशची पत्नी तसेच कुटुंबीयांनी सुद्धा हातभार लावलेला आहे. योगेशच्या पत्नीने महिला गट तयार केला आहे जे की युट्यूब वर तिने पाककृती चे व्हिडीओज बनवते. मागील २-३ वर्षात योगेश ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Share your comments