1. यशोगाथा

मानलं डॉक्टर साहेब! पेशन्टची सेवा करत केली शेती; डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता फॉरेन रवाना

आपल्या देशात असंख्य नवयुवक शेतीकडे पाठ फिरवीत नोकरीकडे व व्यवसायाकडे धावू लागले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात असा एक खानदेशी पुत्र आहे जो आपला नोकरी व्यवसाय सांभाळत शेती करीत आहे. विशेष म्हणजे हा अवलिया पेशाने डॉक्टर आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
melon farming

melon farming

आपल्या देशात असंख्य नवयुवक शेतीकडे पाठ फिरवीत नोकरीकडे व व्यवसायाकडे धावू लागले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात असा एक खानदेशी पुत्र आहे जो आपला नोकरी व्यवसाय सांभाळत शेती करीत आहे. विशेष म्हणजे हा अवलिया पेशाने डॉक्टर आहे.

या खानदेशरत्न डॉक्टरांनी नावापुरती शेती केली नसून शेती क्षेत्रात काळाच्या ओघात अमुलाग्र परिवर्तन घडून आले आहेत. पीकपद्धतीत मोठा बदल करीत या डॉक्टरांनी चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. एवढेच नाही डॉक्टरांनी उत्पादित केलेले खरबूज विदेशात रवाना झाले आहे. आज आपण याच डॉक्टरांच्या यशाविषयी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा:-अरे व्वा! अशिक्षित महिला शेतकऱ्यास उत्कृष्ट कामगिरी बद्दल मिळाले दोन राष्ट्रपती पुरस्कार, वाचा ही आगळीवेगळी यशोगाथा

नंदुरबार जिल्ह्यातील वडाळा येथील डॉक्टर नंदलाल चौधरी आपला डॉक्टरकी व्यवसाय सांभाळत शेती करतात. नंदलाल यांनी आपल्या दोन एकर बागायती क्षेत्रात खरबुजाची लागवड केली. यासाठी आधुनिकतेची कास धरत त्यांनी पॉलिहाऊसची उभारणी देखील केली होती. नंदलाल यांनी आलिया आणि हनिड्यू या दोन जातीच्या खरबूज पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी तज्ज्ञांनी सांगितलेल्या सल्याचे देखील पालन केले.

नंदलाल यांनी खरबूज लागवड केल्यानंतर आपल्या योग्य नियोजनाच्या जोरावर दर्जेदार उत्पादन मिळवले. नंदलाल यांच्या खरबूज ला 30 रुपये प्रति किलो असा दर देखील मिळाला. खरबूज पिकापासून डॉक्टर साहेबांना चांगला नफा मिळाला असून इतर शेतकऱ्यांसाठी डॉक्टर एक प्रेरणा स्त्रोत ठरत आहेत.

हेही वाचा:-लई भारी! लसूण लागवड करून 'हा' शेतकरी कमवतोय पाच लाख रुपये

डॉक्टर यांच्या मते, निसर्गाचा लहरीपणा बघता पॉली हाउसची आता गरज वाढली आहे. पॉली हाउस असतानादेखील  डॉक्टर साहेबांनी कृषी क्षेत्रातील तज्ञांचा तसेच कृषि विभागाचा सल्ला सर्वोपरि मानला. डॉक्टर साहेबांनी केलेल्या कार्याची आजूबाजूच्या पंचक्रोशीत मोठी चर्चा असून अनेक शेतकरी डॉक्टर साहेबांचा शेतीमधील हा नवीन प्रयोग बघण्यासाठी येतात.

डॉक्टरांच्या मते, आधुनिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज बनली आहे मात्र असे असले तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अजूनही आधुनिक पद्धतीने शेती करण्याबद्दल जागृत करणे महत्त्वाचे आहे कारण की शेतकऱ्यांना अजून याबाबत माहित नाही. डॉक्टर नंदलाल यांच्या शेतात आजूबाजूचे शेतकरी भेट देतात व या पद्धतीने शेती करण्याचा निर्धार करतात. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे खरबूज विदेशात एक्सपोर्ट केले जात आहे. एवढेच नाही सुरत, मुंबई सारख्या बड्या देशांतर्गत बाजारपेठेत देखील त्याची विक्री होतं आहे.

हेही वाचा:-वावर है तो पॉवर है! विदेशातली नौकरी सोडून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल

English Summary: Farming while serving the patient; The melon grown by the doctor is now sent abroad Published on: 29 March 2022, 03:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters