![Farmers, you too can earn millions by planting this tree; Learn how](https://kjmarathi.b-cdn.net/media/17242/मलब-र1.jpg)
Farmers, you too can earn millions by planting this tree; Learn how
सध्या अनेक लोक नोकरीला कंटाळले आहेत, प्रत्येकाला आपला व्यवसाय चालू करण्याची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा याबाबत अनेकांना कल्पना नसते. अनेकांकडे शेती असते पण त्यामध्ये काय करायचे याबाबत त्यांना सुचत नसते. सध्या अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत. व नवनवीन प्रयोग करून नफा कमवत आहेत.
आज आपण अश्याच एका शेतीत करण्यात येणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती घेणार आहोत. तुम्ही जर शेती करण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. शेतीमध्ये मलबार कडुनिंबाची शेती करून तुम्ही अनोखा व्यवसाय करू शकता. ही झाडे पिकांसोबतही लावता येतात.
जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त जमिनीची गरज भासणार नाही. मलबार कडुनिंब किंवा मेलिया डुबिया या झाडाला अनेक नावांनी संबोधले जाते. मलबार कडुलिंब निलगिरीप्रमाणे वेगाने वाढते. त्याची रोपे लावल्याबरोबर २ वर्षांत ४० फूट उंचीपर्यंत वाढतात. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या झाडाची लागवड करत आहेत.
मलबार कडुलिंबाचे झाड सामान्य कड्डुलिंबापेक्षा थोडे वेगळे आहे. या झाडासाठी कोणतीही जमीन चालते. यासाठी जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात ते चांगले वाढू शकतात. मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याचे बियाणे पेरणे चांगले मानले जाते. मलबार कडुनिंब हे ४ एकरात ५००० झाडे लावता येतील. ज्यामध्ये शेताबाहेरील कड्यावर २००० झाडे आणि शेताच्या आत कड्यावर ३००० झाडे लावता येतील.
पाच वर्षांत हे झाड मोठे होते. एका वर्षात झाड ८ फूट उंचीपर्यंत वाढते. त्याच्या झाडांमध्ये दीमक नसल्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. मलबार झाडाचे लाकूड प्लायवूड उद्योगासाठी मागणी आहे. मलबार कड्डुलिंबाचे लाकूड तुम्ही ८ वर्षांनंतर विकू शकता.
तुम्ही ४ एकरात लागवड करून तुम्ही ५० लाख रुपये कमवू शकता. एका झाडाचे वजन दीड ते दोन टन असते. किमान हा ५०० रुपये क्विंटल बाजारात विकला जातो. अशा परिस्थितीत एक रोप सहा ते सात हजार रुपयांना विकले तरी शेतकऱ्यांना लाखो रुपये सहज मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या
भावांनो यावर्षी पाऊस येणार लवकर! 20 ते 21 मेपर्यंत अंदमानमध्ये ते 30 मे पर्यंत केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन
यंदाच्या वर्षातील पीएम किसानचा पहिला हप्ता कधी मिळणार?
Share your comments