भारतात शेती व्यवसायाकडे तोट्याचा व्यवसाय म्हणून बघितले जाते. गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता तरुणवर्ग शेतीकडे आकर्षित होत नाही. पण असंख्य संकटांवर मात करून एका तरुणाने स्वतःच्या बळावर शेती यशस्वी करून दाखवली आहे. तो तरुण नांदेड जिल्ह्यातील अंचोली येथील रणजित निकम. निकम यांनी यशस्वी शेती करत शेतीतून चांगले उत्पन्न मिळावले आहे.
दरवर्षी शाश्वत उत्पादन घेणारा शेतकरी त्यांची परिसरात ओळख आहे. हे सर्व शक्य झाले जमिनीतील सेंद्रिय घटकांमुळे सेंद्रिय घटकांचा वापर दरवर्षी आणि प्रत्येक हंगामात ते शेतीत करतात. त्यामध्ये काडीकचरा पिकांचे अवशेष सोयाबीन, तुर, गहु, हरभरा ह्या पिकांचा भुसा कुटार यांवर प्रक्रिया करून शेतामध्ये टाकतात.
शेतीबद्दल ते सांगतात की, ट्रायकोडर्मा वेस्ट डि कंपोजर यांची प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतील हानिकारक बुरशी कमी होते. काडीकचरा लवकर कुजतो आणि पिकांना सेंद्रिय किंवा कंपोस्ट खतांच्या स्वरूपात उपलब्ध होतो. यामुळे जमिनीतील मित्र किडींची वाढ होते. गांडूळाची संख्या वाढते जमिनीला भेगा पडत नाहीत. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला की उत्पादन चांगले येणार हे मात्र नक्की. सुरुवातीला आम्ही पण मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरली आणि भरपूर उत्पादन पण मिळाले पण दोन वर्षानंतर खतांवरील व औषधांवरील खर्च खुपच वाढला. तेव्हा आम्हाला खरी मदत केली ती म्हणजे भारत सरकारच्या किसान कॉल सेंटरनी. खतांची माती परीक्षण नुसार योग्य निवड व वापर फवारणी द्वारे खतांचा वापर पाण्याचा योग्य तेवढाच वापर यामुळे आमचा खतांवरील व औषधांवरील खर्च बऱ्यापैकी कमी झाला. हळूहळू उत्पादन वाढत होते.
सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचे कृषी तज्ञांचे मार्गदर्शन -
ऑडियो कॉन्फरन्स व्हिडिओ कॉन्फरन्स यांच्या माध्यमातून सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचे कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळत होते. आम्हाला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत होते. मग आम्ही जैविक शेतीकडे वळलो २०२१७ पासून २०२३ पर्यंत सोयाबीन पिकावरील पुर्णपणे फवारणीचा खर्च वाचला. कारण निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी केली. २०१९ आणि २०२१ ला शेवटची फवारणी क्लोरोपायरीफॉस २० टक्केची फवारणी केली. कारण ढगाळ आणि पावसाचे वातावरण असल्यामुळे ती फवारणी करावी लागली. आता खुप चांगल्याप्रकारे शेतीचे नियोजन आहे. यावर्षी सोयाबीन पिकाचे नियोजन सोयाबीन पेरणीपूर्व मशागतीसोबतच सेंद्रिय खत टाकून घेतला. पेरणी सोबत ९० टक्के सल्फर ५ किलो प्रति एकर दिले. फवारणी मधून निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे मायक्रोला फवारणी मधून दिले. पेरणी पद्धती पारंपरिक पद्धतीने करून सुद्धा २७ किलो बियाण्यास ११ आणि १२ क्विंटल उत्पादन मिळाले.
स्मार्टफोनचा योग्य वापर करुन कृषी पुरस्कार -
कोण म्हणत सेंद्रिय शेती फायद्याची नाही ती उत्पादन कमी देते. माती जीवंत राहीली की उत्पादन मिळणारच रासायनिक शेतीमध्ये उत्पादन जास्त मिळते हा आपला भ्रम आहे. कारण आपण जास्तीचे रासायनिक खते टाकले की जास्त उत्पादन मिळते. पण खर्च बघा ना ७० ते ९० टक्के खर्च तर खते आणि औषधांवरच होतो म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. शेतीमध्ये use and throw हा नियम लागू होत नाही. आपण जास्त उत्पादनाचा हव्यास न करता आपली माती कशी टिकून राहील तिचे आरोग्य चांगले कसे राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात माती परीक्षण केले पाहिजे किमान दरवर्षी तरी माती परीक्षण केले पाहिजे, यामुळे आपल्याला आपल्या मातीचे आरोग्य कसे आहे हे पाहता येईल. आज स्मार्टफोनचे युग आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक (युवा)शेतकऱ्यांनी त्याच्या उपयोग करून घेतला पाहिजे. मी पण स्मार्टफोनचाच वापर करतो शेतीमध्ये नवीन काय करता येते का हे बघतो आणि शिकतो.दररोज एखाद्या कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेतो म्हणून तर कृषी विभागाने आमची दखल घेऊन शेती दिन २०२३ निमित्ताने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील शेतकरी पुरस्काराने सन्मान केला. तसंच २६ जानेवारी २०२४ ला आरसीएफचा उत्कृष्ट शेतकरी सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना निकम सांगतात की, माती परीक्षणनुसार जमिनीमध्ये खते द्या जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करा. जनावरांची संख्या कमी असेल तर पिकांचे अवशेष प्रक्रिया करून शेतामध्ये टाका जैविक पद्धतीने किड नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा कृषी विभागाच्या संपर्कात राहा, शेतकरी मित्रांशी सल्ला मसलत करा. शेती विचारांची देवाणघेवाण करा. मी पण कृषी विभागाच्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतो आपणही घ्या आणि चांगली शेती करा. मला शेतीमध्ये मदत आणि मार्गदर्शन आई वडिलांकडून मिळते. माझी आई नेहमी म्हणते प्रयत्न करत राहा नक्कीच यश मिळेल असे सांगते. यामुळे शेती करण्यासाठी मला प्रेरणा मिळते. प्रगतीशील शेतकरी शेतकरी कोंडीबा बापुराव पा.ढाले, शरद निळकंठवार सर कृषी सहायक किनवट यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.
Share your comments