शेतकरी बांधव कधी काय करतील याचा नेम नसतो. शेतीमध्ये यशस्वी उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नाना प्रकारचे कष्ट करत असतात. वेळप्रसंगी जुगाड करून देखील शेतकरी बांधव शेतीमध्ये चांगले उत्पादन अर्जित करत असतात. हिंगोली मधील एका शेतकऱ्याने देखील वाढत्या तापमानात जरबेरा फुलाचे यशस्वी उत्पादन घेण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे आणि या जुगाडाची सध्या राज्यात सर्वत्र चर्चा बघायला मिळत आहे. खरं पाहता भारत एक जुगाडू देश म्हणून ओळखला जातो आणि हे शाश्वत सत्य देखील आहेत.
Important News : Pm Kisan : आता ई-केवायसी करण्यासाठी ही सुविधा झाली सुरु; 2 हजार प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर करा ई-केवायसी
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील रहिवाशी शेतकरी पंकज आडकिने यांनी जरबेरा फुलाची आपल्या वावरात लागवड केली आहे. आपल्या वडिलोपार्जित शेती पैकी दहा गुंठे क्षेत्रात त्यांनी जरबेरा फुलांची लागवड केली यासाठी त्यांनी शेडनेट देखील उभारले. मात्र यंदा उन्हाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे विशेषता मराठवाडा आणि विदर्भ मध्ये उन्हाच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. यामुळे शेत पिकांना मोठा फटका बसत आहे.
पंकज यांनी लागवड केलेल्या जरबेरा फुल पिकाला देखील वाढत्या उन्हाचा फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे पंकज यांनी सांगितले. उत्पादनात घट थांबवण्यासाठी पंकज यांनी एक जुगाड करत जरबरा फुलशेतीला चक्क कूलरने हवा देण्यास सुरुवात केली आहे.
या जुगाडमुळे जरबेरा फुलशेती वर होत असलेला प्रतिकूल परिणाम बऱ्याच अंशी कमी करण्यात आला आहे आणि पंकज यांना आता या फुलशेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळण्याची आशा आहे.
Important News : Minister Dada Bhuse : कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकास्पद 'दादागिरी'!! दादांनी जुगार अड्डा केला उध्वस्त…..
पंकज यांनी दहा गुंठे क्षेत्रात शेडनेटची उभारणी केली आणि जेरबेरा लागवडीचा निर्णय घेतला. शेडनेट उभारण्यासाठी पंकज यांना जवळपास 10 लाख रुपयांचा खर्च आला आहे. दहा लाखांचा शेडनेटचा खर्च आणि जरबेरा फुलशेती साठी त्यांनी आत्तापर्यंत अडीच लाखांचा खर्च केला आहे.
विशेष म्हणजे पंकज यांनी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जरबेरा फुलशेतीतून चांगले उत्पादन मिळवले आहे त्यामुळे त्यांना उन्हाळी हंगामातील जरबेरा फुलशेतीतून देखील अधिक उत्पादन मिळण्याची आशा आहे मात्र तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांना नाना प्रकारच्या जुगाडाची व्यवस्था करावी लागत आहे.
वाढत्या तापमानामुळे त्यांच्या जरबेरा फुल कोमेजून जातं होते यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांचा सल्ला घेतला मात्र कुठलाही ठोस उपाय त्यांना गावला नाही शेवटी त्यांनी आपल्या शेडनेटमध्ये पाच कुलरची व्यवस्था केली आणि आता जरबेरा फुलशेतीला ते कुलर च्या साह्याने गारवा देत आहेत. यामुळे जरबेराची फुले आता टवटवीत होत असून त्यांना यातून चांगल्या उत्पादनाची आशा आहे.
Important News : Organic Fertilizer : शेणखताची डिमांड वाढली!! एक ट्रकची किंमत ऐकून बसेल शॉक
Share your comments