उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून कलिंगडाकडे बघितले जाते. असे असताना आता या हंगामात कलिंगडाचा चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे मुख्य पिकांपेक्षा या पिकातून कमी दिवसात शेतकरी चांगले पैसे कमवत आहे. यामुळे शेतकरी याकडे वळाले आहेत. यंदा तर हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला 10 रुपये किलो असा दर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जे नुकसान झाले ते भरुन निघत आहे.
कलिंगड असे पीक आहे जे तीन मुख्य टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी पडले तरी अधिकचे उत्पन्न मिळते. सध्या बाजारपेठेत दाखल होत असलेले कलिंगड हे (Summer Season) उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता या अनुशंगाने लागवड केलेले आहेत. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर याला मागणी असते. तसेच रमजान महिन्यात देखील याची मागणी वाढते. यामुळे काही दिवसांच्या फरकाने केलेली लागवड शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणार आहे.
सध्या ज्या शेतकऱ्यांच्या कलिंगडची तोडणी सुरु आहे, त्याच्या खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत आहेत. शुगर किंग आणि मक्स या वाणांच्या कलिंगडला अधिकची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा खर्च देखील वाचणार आहे. तसेच 10 रुपये किलो असा दर मिळत असून या कलिंगडची विक्री ही कर्नाटकात होत आहे.
यामुळे सध्या मोठ्या आणि मुख्य पिकांमधून जे घडले नाही ते यंदा हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे योग्य नियोजन केले तर वर्षभराचे पैसे मिळणार आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली तर काहींनी उत्पादन हे घेतलेच आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाण्याची चिंता मिटलेली आहे. यामुळे फायदा होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
PM Kisan Scheme; 11व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग बातमी वाचून करा हे काम, नाहीतर पैसे येणार नाहीत
शेतकऱ्यांनो सावध रहा!! आता अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, असा झाला कारनामा उघड..
अतिरिक्त उसाचे अनेकांनी केले सोने, कारखान्यावर चकरा न मारता कमवले लाखो, जाणून घ्या कसे...
Share your comments